Penny Stock News : स्वस्तातला हा स्टॉक पैसे दुप्पट करणार, खरेदीसाठी उडाली झुंबड
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Penny Stock News : स्वस्तातला हा स्टॉक पैसे दुप्पट करणार, खरेदीसाठी उडाली झुंबड

Penny Stock News : स्वस्तातला हा स्टॉक पैसे दुप्पट करणार, खरेदीसाठी उडाली झुंबड

Jan 02, 2024 12:50 PM IST

Sadhana Nitro Chem Share Price : साधना नायट्रो केम लिमिटेड या कंपनीच्या छोट्याशा शेअरबाबत विश्वास व्यक्त करत मार्केट एक्सपर्ट्सनी हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

Penny Stock
Penny Stock

Penny Stocks News : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा आहे, पण पुरेसे पैसे नाहीत. अशा लोकांसाठी पेनी स्टॉक हा एक पर्याय असतो. व्यवस्थित अभ्यास करून गुंतवणूक केल्यास हा स्टॉक चांगला परतावाही देतो. नुकत्याच संपलेल्या वर्षात पेनी स्टॉक्सनी गुंतवणूकदारांना मालामाल केलं. २०२४ मध्ये देखील काही स्टॉक असा फायदा मिळवून देऊ शकतात असं विश्वास तज्ज्ञांना आहे. 

साधना नायट्रो केमिकल हा असाच एक पेनी स्टॉक आहे. हा स्टॉक कमोडिटी केमिकल्सशी संबंधित आहे. हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. सध्या या शेअरची किंमत ९२ रुपयांच्या आसपास आहे. येत्या काही दिवसांत हा शेअर २०० रुपयांच्या पुढं जाईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

New Year Stocks : २०२४ मध्ये हे दर्जेदार स्टॉक देतील जबरदस्त रिटर्न, एक्सपर्ट्सचा खरेदीचा सल्ला

काय आहे टार्गेट प्राइस?

प्रॉफिटमार्ट रिसर्चच्या अहवालानुसार, साधना नायट्रो केमिकलचे शेअर्स पुढील १८ महिन्यांत सुमारे २०४ रुपयांपर्यंत जाऊ शकतात. आजची किंमत पाहिल्यास हा शेअर विकत घेण्याची उत्तम संधी आहे. नव्या वर्षाच्या दुसऱ्या ट्रेडिंग दिवशी, म्हणजेच आज हा शेअर १.२६ टक्क्यांनी वाढला आहे.  या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १२१.२३ रुपये आहे. मागील वर्षीच्या जून महिन्यात या शेअरनं उच्चांक नोंदवला होता. तर, २५ ऑगस्ट २०२३ रोजी शेअरची किंमत ६६ रुपयांपर्यंत घसरली होती.

काय करते ही कंपनी?

साधना नायट्रो केम लिमिटेड ही कंपनी १९७३ मध्ये स्थापन झाली. केमिकल उद्योगातील ही एक महत्त्वाची कंपनी आहे. नायट्रो बेंझिन, मिथेनिल अ‍ॅसिड, एमएपी इत्यादी बेंझिन आधारित संयुगांशी संबंधित रसायनं ही कंपनी तयार करते. ही रसायनं कागद, फार्मा, अ‍ॅग्रोकेमिकल्स, थर्मल डाईज, लाईट स्टॅबिलायझर्स, एरोस्पेस आणि रंग आणि इंटरमीडिएट्स यांसारख्या क्षेत्रात वापरली जातात. रायगड जिल्ह्यातील रोहा इथं कंपनीच्या केमिकलचं उत्पादन होतं.

IPO Explainer : आयपीओ म्हणजे काय? जाणून घ्या स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीचा भन्नाट पर्याय

शेअरहोल्डिंग पॅटर्न कसा आहे?

साधना नायट्रो केम लिमिटेडच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचं झाल्यास ७१.१२ टक्के हिस्सा प्रवर्तकांकडं आहे. सार्वजनिक भागीदारी २८.८८ टक्के आहे. प्रवर्तक किंवा प्रवर्तक गटात ९ जण आहेत. कंपनीचे मुख्य प्रवर्तक असित झवेरी आहेत. त्यांच्याकडं कंपनीचे १,४१,६६,६३० शेअर्स आहेत. ही आकडेवारी सप्टेंबर तिमाहीपर्यंतची आहे.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्तात कंपनीच्या व शेअरच्या कामगिरीची केवळ माहिती देण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

Whats_app_banner