Railway Stocks : रेल विकास निगम लिमिटेडच्या (RVNL) शेअर्सनी आज शेअर बाजारात धुमाकूळ घातला आहे. कंपनीचा शेअर आज ९.१९ टक्क्यांनी वधारून ४०६.१० रुपयांवर पोहोचला. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कडून मिळालेली तब्बल ३६२२ कोटींची ऑर्डर हे या तेजीमागचं कारण आहे.
बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर रेल विकास निगम लिमिटेडनं बीएसएनएलकडून मंजुरीपत्र मिळाल्याचं जाहीर केलं. बीएसएनएलकडून भारत नेट मिडल माइल नेटवर्कच्या डिझाइन, बिल्ड, ऑपरेट आणि मेंटेनन्सवर डेव्हलपमेंट (बांधकाम, अपग्रेडेशन आणि ऑपरेशन आणि मेंटेनन्स) साठी मंजुरी मिळाली आहे.
या मंजुरीची माहिती कंपनीनं दिल्यानंतर आरव्हीएनएलचा शेअर गुरुवारी बीएसईवर ३८८.०० रुपयांवर उघडला. त्यानंतर त्यात वाढ होत गेली. शेअरचा भाव ९ टक्क्यांनी वाढून ४०६.१० रुपयांवर पोहोचला.
गेल्या दोन वर्षांत आरव्हीएनएलचे शेअर्स जवळपास ५ पटीनं वधारले आहेत. गेल्या ५ वर्षांत त्यात १४८४ टक्के वाढ झाली असून गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे. पाच वर्षांपूर्वी या शेअरचा भाव २५ रुपये होता. २०१९ मध्ये कंपनीचे शेअर्स १९ रुपयांच्या किंमतीवर होते. या कालावधीत त्यात १९०० टक्क्यांपर्यंत वाढ नोंदविण्यात आली आहे. वर्षभरात हा शेअर ८० टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीच्या शेअरची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत ६४७ रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत २१३ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ८३७२३.९८ कोटी रुपये आहे.
संबंधित बातम्या