RVNL Share price : रेल विकास निगम लिमिटेडला एक मोठा प्रकल्प मिळाला आहे. कंपनीने १८ नोव्हेंबर रोजी शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, त्यांना दक्षिण मध्य रेल्वेकडून २९४.९४ कोटी रुपयांच्या मान्यतेचे पत्र मिळाले आहे. मात्र, आज सोमवारी कंपनीचा शेअर जवळपास एक टक्का घसरणीसह ४१६ रुपयांवर बंद झाला.
कंपनीला या प्रकल्पांतर्गत तेलंगणमधील नवीपेट स्थानक ते इंदलवाई स्थानकापर्यंत दुहेरी ट्रॅक बांधायचा आहे. या प्रकल्पांतर्गत सिग्नल आणि विद्युतीकरणाचे कामही कंपनीला करावे लागणार आहे. कंपनीला हे काम २४ महिन्यांत पूर्ण करायचे आहे.
कंपनीने सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीने शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, सप्टेंबर तिमाहीत त्याचा निव्वळ नफा २८६.९० कोटी रुपये होता. ज्यात वार्षिक आधारावर २७ टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर तिमाहीत कंपनीला ३९४.३० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
सरकारी रेल्वे कंपनीच्या महसुलातही वार्षिक आधारावर १.२ टक्क्यांनी घट झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल ४८५५ कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत रेल विकास निगम लिमिटेडचा महसूल ४९१४.३० कोटी रुपये होता.
गेल्या महिन्याभरात रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअर्सच्या किमतीत सुमारे ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर ज्या गुंतवणूकदारांनी ६ महिने शेअर ठेवला आहे, त्यांना आतापर्यंत जवळपास ३९ टक्के वाढ झाली आहे. २०२४ मध्ये रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअरची किंमत १२८ टक्क्यांनी वाढली आहे.