Share market news in marathi : शेअर बाजारात आज रेल्वे कंपन्यांचा बोलबाला होता. रेल्वे विकास निगम लिमिटेडसह ५ कंपन्यांचे शेअर खरेदी करण्यासाठी आज अक्षरश: झुंबड उडाली होती. परिणामी या शेअर्समध्ये आज ७ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
रेल्वे विकास निगम लिमिटेडचा (RVNL) शेअर बीएसईवर ४३५.९५ रुपयांवर खुला झाला. काही वेळेतच कंपनीच्या शेअरचा भाव जवळपास ३ टक्क्यांनी वाढून ४६.८० रुपयांवर पोहोचला. गेल्या महिन्याभरात कंपनीच्या शेअरच्या किमतीत ४.६१ टक्क्यांची वाढ झाली आहे. आरव्हीएनएलसाठी मागचे सहा महिने चांगले गेले नसले तरी कंपनीनं गुंतवणूकदारांना एका वर्षात १६२.९५ टक्के परतावा दिला आहे.
या कंपनीच्या शेअरचा भाव आज ३ टक्क्यांनी वाढला आहे. बीएसईवर कंपनीचा इंट्राडे उच्चांक १५१.७० रुपयांच्या पातळीवर पोहोचला. गेल्या महिन्याभरात आयआरएफसीच्या शेअरमध्ये जवळपास १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडच्या शेअर्सच्या किंमतीत सर्वाधिक ७ टक्क्यांची वाढ झाली आहे. बीएसईवर कंपनीचा शेअर १९८.५५ रुपयांच्या पातळीवर उघडला. कंपनीचा शेअर इंट्राडेमध्ये ७ टक्क्यांनी वाढून २११.७० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या आठवडाभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत १२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३५१.६५ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १५७.५० रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप १९,८७७.८० कोटी रुपये आहे. आयआरसीटीसी, रेलटेल या रेल्वे कंपन्यांच्या शेअर्समध्येही आज तेजी दिसून आली.