rules changed from April 1 : केंद्र सरकारने आज १ एप्रिलपासून अनेक नियम बदलले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे. आजपासून एलपीजी दर आणि वाहनांच्या किमतीत मोठा बदल करण्यात अल आहे. दरम्यान, सरकारने काय काय नियम बदलले याची माहिती घेऊयात.
आजपासून म्हणजेच १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. या बदलामुळे एलपीजी दर आणि वाहनांच्या किमतीवरही परिणाम झालेला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेले बहुतांश नवीन कर आणि नियम आज पासून लागू होणार आहेत.
आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ३२ रुपयांनी कमी झाल्या आहेत. दिल्लीत ३०.५० रुपयांनी गॅस सिलेलंदर स्वस्त झाला आहे. तर मुंबईत हा सिलेंडर ३१.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर कोलकात्यात ३२ रुपयांनी व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झाला आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने तुमच्या जमा रकमेवर स्वयंचलित हस्तांतरण प्रणाली लागू केली आहे. जेव्हा तुम्ही नवीन नोकरी सुरू करता तेव्हा तुम्हाला मॅन्युअल फंड ट्रान्सफरची विनंती करावी लागणार नाही. ईपीएफओ तुमची पीएफ शिल्लक तुमच्या नवीन नियोक्त्याच्या खात्यात थेट जमा करेल.
१ एप्रिल २०२४ पासून नवीन कर प्रणाली लागू करण्यात येणार असून ही प्रणाली आपोआप लागू होणार आहे. याचा अर्थ जोपर्यंत तुम्ही जुनी कर व्यवस्था निवडत नाही तोपर्यंत तुमची कर गणना नवीन नियमांनुसार आपोआप केली जाईल. नवीन प्रणालीसाठी कर मर्यादा आर्थिक वर्ष २०२४-२५ (कर वर्ष २०२५-२६) साठी समान राहणार आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात यात कोणतेही बदल जाहीर करण्यात आले नाहीत. तुमचे वार्षिक उत्पन्न ७ लाख रुपये किंवा त्याहून कमी असल्यास, तुम्हाला नवीन प्रणाली अंतर्गत कोणताही आयकर भरावा लागणार नाही.
आजपासून, राष्ट्रीय पेन्शन प्रणालीसाठी (PFRDA) अतिरिक्त सुरक्षा उपाय लागू होणार आहेत. पासवर्डद्वारे सीआरए प्रणालीमध्ये प्रवेश करण्यासाठी या यंत्रणेत दोन घटक आधार क्रमांकावर आधारित सुरक्षा व्यवस्था लागू केली जाणार आहे.
बँकांमधील वार्षिक लेखासंबंधित कामामुळे, १ एप्रिल २०२४ रोजी म्हणजेच सोमवारपासून २००० रुपयांची नोट बदलण्याची किंवा जमा करण्याची सुविधा बंड करण्यात येणार आहे. ही सुविधा दुसऱ्या दिवशी मंगळवारी मध्यवर्ती बँकेच्या १९ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पुन्हा पूर्ववत केली जाणार आहे.
आजपासून टोयोटा किर्लोस्कर मोटरची काही निवडक वाहने ही महाग झाली आहेत. उत्पादन खर्च आणि व्यवस्थापन खर्चात वाढ झाल्यामुळे टीकेएमने १ एप्रिलपासून त्यांच्या निवडक वाहनांच्या किमती १ टक्क्याने वाढवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. ही दर वाढ काही मोजक्या मॉडेल्सवर लागू होणार आहे.
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या FAME-2 योजनेला सरकार ३१ मार्चनंतर बंद करणार आहे. या योजनेची मुदत वाढवण्याचे वृत्त होते. मात्र, ही वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट करत अवजड उद्योग मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली. ३१ मार्चनंतर ई-वाहनांना अनुदान मिळणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
ऑटोमोबाईल कंपनी Kia India ची वाहने आजपासून तीन टक्क्यांनी महाग झाली आहेत. कंपनी Kia Seltos, Sonet आणि Carens मॉडेल विकते. कंपनीने यावर्षी पाहिल्यांदा त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आतापर्यंत भारतात आणि परदेशी बाजारात ११.६ लाख वाहनांची विक्री केली आहे.
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने विविध नियम अधिसूचित केले आहेत. यामध्ये विमा पॉलिसी परत करणे किंवा समर्पण करण्याशी संबंधित शुल्क देखील समाविष्ट करण्यात आले आहे. यामध्ये विमा कंपन्यांना असे शुल्क आधीच जाहीर करावे लागणार आहे. IRDAI म्हणते की जर एखाद्याने पॉलिसी जास्त काळ ठेवली तर सरेंडर व्हॅल्यू ही जास्त राहील.
संबंधित बातम्या