एक ऑगस्टपासून बदलतायत 'हे' महत्त्वाचे नियम; तुमच्या खिशावर होऊ शकतो थेट परिणाम
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  एक ऑगस्टपासून बदलतायत 'हे' महत्त्वाचे नियम; तुमच्या खिशावर होऊ शकतो थेट परिणाम

एक ऑगस्टपासून बदलतायत 'हे' महत्त्वाचे नियम; तुमच्या खिशावर होऊ शकतो थेट परिणाम

Updated Jul 31, 2024 10:52 AM IST

Rules changes from 1 august : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला वेगवेगळ्या सेवा व सुविधांशी संबंधित नियमात बदल होत असतात. उद्यापासून सुरू होणाऱ्या महिन्यात काय होऊ शकते. पाहूया…

एक ऑगस्टपासून बदलतायत 'हे' महत्त्वाचे नियम; मध्यमवर्गीयांशी आहे थेट संबंध
एक ऑगस्टपासून बदलतायत 'हे' महत्त्वाचे नियम; मध्यमवर्गीयांशी आहे थेट संबंध

Rules changes from 1 august : जुलै महिन्याचा आज शेवटचा दिवस असून उद्यापासून आपण नव्य महिन्या प्रवेश करत आहोत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक प्रकारच्या नियमांमध्ये बदल होत असतात. किंबहुना महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक सरकारी आणि वित्तीय संस्था आपल्या नियमांमध्ये बदल करतात, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो.

ऑगस्ट महिनाही त्यास अपवाद नाही. १ऑगस्टपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतींपासून गुगल मॅप सेवा आणि क्रेडिट कार्डपर्यंत अनेक नियम बदलणार आहेत. जाणून घेऊया सविस्तर...

एलपीजी सिलिंडरचे दर

दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजी सिलिंडरचे दर बदलतात. गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती. त्यामुळं या महिन्यातही घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात आणखी कपात होण्याची अपेक्षा अनेकांना आहे.

एचडीएफसी बँक

१ ऑगस्टपासून एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल करणार आहे. पुढील महिन्यापासून बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना थर्ड पार्टी पेमेंट अ‍ॅप्सद्वारे होणाऱ्या सर्व भाड्याशी संबंधित व्यवहारांवर एक टक्का रक्कम आकारली जाणार असून प्रत्येक व्यवहारासाठी कमाल मर्यादा ३ हजार रुपये असेल. पेटीएम, क्रेड, मोबिक्विक सारख्या थर्ड पार्टी पेमेंट अ‍ॅप्सचा वापर करून भाड्याचे व्यवहार करता येतात. ५० हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या युटिलिटी ट्रान्झॅक्शनवर कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. मात्र, त्यापेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांसाठी १ टक्का शुल्क आकारलं जाणार आहे. प्रत्येक व्यवहारासाठी ३ हजार रुपयांची मर्यादा आहे. १५ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या इंधन व्यवहारांसाठी १ टक्के शुल्क आकारलं जाईल. क्रेड, पेटीएम आदी थर्ड पार्टी अ‍ॅप्सद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर १ टक्के शुल्क आकारलं जाईल. प्रत्येक व्यवहारासाठी ३ हजार रुपयांची मर्यादा आहे.

गुगल मॅपमध्ये बदल

१ ऑगस्टपासून गुगल मॅप भारतात महत्त्वपूर्ण बदल करत आहे. अधिकाधिक सेवा पुरवठादारांना गुगलचा नकाशा वापरता यावा, यासाठी पुढील महिन्यापासून कंपनी आपला सर्व्हिस चार्ज ७० टक्क्यांनी कमी करणार आहे. तसंच, सेवा वापरणाऱ्या कंपन्यांकडून भारतीय चलनात पैसे स्वीकारले जाणार आहेत. सर्वसामान्य युजर्सना कोणतंही नवं शुल्क भरावं लागणार नाही.

फास्टॅगचं काय?

फास्टॅगचे नवे नियम १ ऑगस्टपासून लागू होणार आहेत. १ ऑगस्टपासून फास्टॅगची केवायसी बंधनकारक असणार आहे. आधीच अनेक नियम लागू असले तरी फास्टॅगसाठी नवीन केवायसी आवश्यक आहे. १ ऑगस्टपासून कंपन्यांना एनपीसीआयच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. या नियमांमध्ये ३ ते ५ वर्षांपेक्षा जुन्या फास्टॅगसाठी केवायसी अद्ययावत करणं आणि ३१ ऑक्टोबरपर्यंत पाच वर्षांपेक्षा जुन्या फास्टॅगमध्ये बदल करणं यांचा समावेश आहे.

सीएनजी-पीएनजीचे दर बदलणार!

देशभरात महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल करण्याबरोबरच तेल विपणन कंपन्या विमान इंधन आणि सीएनजी-पीएनजीच्या दरातही बदल करतात.

इन्कम टॅक्स रिटर्न

३१ जुलै २०२४ ही प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे. ही तारीख चुकल्यास पुढील महिन्यापासून दंड भरावा लागू शकतो. वर्षाच्या अखेरपर्यंत म्हणजेच ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत विलंब शुल्कासह विवरणपत्र दाखल करता येणार आहे.

Whats_app_banner