2000 Rupee Note : २००० ची नोट बँक खात्यात जमा करताच इन्कम टॅक्सची नोटीस येणार?
2000 rupee note IT notice : तुम्ही बँक खात्यात वार्षिक उत्पन्न आणि सामान्य व्यवहारानुसार २००० च्या नोटा जमा करू शकता. मात्र खात्यातील असामान्य व्यवहारांसाठी तुम्हाला आयकराची नोटीस येऊ शकते.
2000 note IT notice : भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांची नोट चलनातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य लोकांना नोटा बदलून देण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक थेट बँकेतून या नोटा रोख स्वरुपात बदलून घेऊ शकतात अथवा बँक खात्यात जमा करु शकतात.
ट्रेंडिंग न्यूज
दरम्यान, बँक खात्यात जमा केल्यास तुम्हाला थेट आयकराची नोटीस येऊ शकते. यापाठीमागचे गणित समजून घेऊ. तज्ज्ञांच्या मते, तुम्ही दररोज जरी २००० रुपयाच्या १० नोटा बँकेत बदलल्यास तुम्हाला कोणीही प्रश्न विचारणार नाही. पण जर बँक खात्यात जमा केल्यास त्या बचत खात्यात अथवा करंट अकाऊंट्समध्ये जमा कराव्यात. तुम्ही वार्षिक उत्पन्नाच्या आधारावर २००० च्या नोटा जमा करु शकतात.
उदाहरणार्थ, जर तुम्ही एका वर्षात १० लाखांचे आयकर रिटर्न भरत असाल आणि तुमचे उत्पन्न आणि खर्च यातील फरक ४ ते ५ लाख असल्याचे दाखवल्यास, तुम्ही ४ ते ५ लाखांच्या मर्यादेपर्यंत २००० रुपयाच्या नोटा जमा करू शकतात. तर दुसरीकडे तुम्ही तुमच्या बँक खात्यात २००० च्या नोटांच्या रूपात १० किंवा २० लाख रुपये जमा केल्यास, आयकर खाते याबाबतच्या प्रश्नांची उत्तरे मागू शकते.
जर बँक खात्यात १० लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली असेल, तर ती एसएफटी मध्ये नोंदवली जाते, अशा परिस्थितीत आयकर खाते तुम्हाला त्या पैशाच्या स्रोताबद्दल विचारू शकते.
त्याचप्रमाणे, करंट अकाऊंटमध्ये ५० लाखांपेक्षा जास्त रक्कम २००० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात जमा केल्यानंतरही आयकर खाते तुमची चौकशी करू शकते. तुम्हाला आयकर नोटीस पाठवली जाऊ शकते. आयकर विभागाकडून नोटीस मिळाल्याचा अर्थ असा नाही की तुम्ही नेहमीच चुकीचे वागतात. प्राप्तिकर विभाग तुम्हाला माहितीसाठी नोटीस देखील पाठवते आणि जर तुम्ही तुमच्या उत्तराने त्यांचे समाधान केले तर तुमच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही.
संबंधित बातम्या
विभाग