Royal Enfield Electric Bike : रॉयल एनफिल्ड बाईक भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय आहेत. आता ब्रिटीश ऑटोमेकर पहिली इलेक्ट्रिक बाईक भारतीय बाजारपेठेत लाँच करण्याच्या तयारीत आहे. उद्या ४ नोव्हेंबर रोजी इलेक्ट्रिक मोटरसायकल लाँच केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी या ईव्ही बाइकचा पहिला फोटो समोर आला होता. कंपनी ईआयसीएमए २०२४ इव्हेंटमध्ये ही बाइक सादर करणार आहे.
या मोटारसायकलला क्लासिक इलेक्ट्रिक असे नाव देण्यात आले आहे. त्यावर फ्लाइंग फी टॅगही देण्यात आला आहे. रॉयल एनफिल्डचे एमडी सिद्धार्थ लाल चालवत असलेल्या या इलेक्ट्रिक मोटारसायकलचा फोटोही कंपनीने यापूर्वी लीक केला होता. या फोटोमुळेच या इलेक्ट्रिक मोटारसायकलची रचना देखील कंपनीच्या इतर बाइक्सप्रमाणे दणकट राहणार आहे.
या इलेक्ट्रिक मोटारसायकलची चाचणी यापूर्वीच परदेशात करण्यात आली आहे. या फोटोंमध्ये रॉयल एनफिल्डच्या पहिल्या प्रॉडक्शन इलेक्ट्रिक मोटारसायकलचा प्रोटोटाइप दिसत आहे. हा फोटो एमसीएनने शेअर केला आहे. या इलेक्ट्रिक मोटारसायकलमध्ये गोल एलईडी हेडलाईट आणि स्लिम आणि लो-स्लंग बिल्ड देण्यात आला आहे. ही बाईक अॅडजस्टेबल लिव्हरने सुसज्ज आहे. बाइकमध्ये इंस्ट्रूमेंट कंसोलजवळ टर्न इंडिकेटर्स लावण्यात आले आहेत. हार्डवेअरमध्ये गर्डर फोर्क्स, अलॉय व्हीलसह टायर आणि ओपन रियर फेंडरचा समावेश आहे. फूटपेगची रचना देखील विशिष्ट पद्धतीने करण्यात अलायी आहे. तर गाडीचा रिअर व्ह्यू मिरर सध्याच्या क्लासिक ३५० मध्ये दिसणाऱ्या मिरर्ससारखाच देण्यात आला आहे.
या ब्रँडच्या इतर बाईकच्या तुलनेत रॉयल एनफील्ड इलेक्ट्रिक स्लिम बॉडीसह येऊ शकते. ही ईव्ही सिटी राईडसाठी एक चांगला पर्याय बनू शकते. रॉयल एनफिल्डच्या इतर बाईक्सच्या तुलनेत या मोटरसायकलचा लूकही वेगळा असू शकतो. रॉयल एनफिल्डच्या या इलेक्ट्रिक बाइकची रेंज १०० ते १६० किलोमीटर दरम्यान असू शकते.
रॉयल एनफिल्डच्या या इलेक्ट्रिक मोटारसायकलच्या बॅटरी पॅक आणि मोटरचा तपशील कंपनीने अद्याप जाहीर केलेला नाही. कंपनीने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक मोटारसायकलचे फ्रंट फोर्क, मेन फ्रेम, स्विंगआर्म सह अनेक ठिकाणी अॅल्युमिनियमचा वापर केला आहे. भारतीय बाजारात इलेक्ट्रिक मोटारसायकलची किंमत सुमारे १.५० लाख रुपये आहे. कंपनीसाठी दुसरी फायद्याची गोष्ट म्हणजे ही बाइक ओलाच्या पहिल्या इलेक्ट्रिक मोटारसायकलच्या आधी लाँच करणार येणार आहे.
रॉयल एनफिल्डच्या इलेक्ट्रिक मोटारसायकलचा फोटो आधीच लीक झाला आहे. या बाईकचे अनेक फीचर देखील या फोटोमुळे उघड झाले आहेत. या बाइकमध्ये शास्त्रीय शैलीतील बॉबरचा फॉर्म फॅक्टर पाहायला मिळणार आहे. इलेक्ट्रिक मोटारसायकलमध्ये मागे सामान वाहून नेण्याची सुविधा असेल. तसेच बाइकच्या चासी रचना देखील अनोखी राहणार आहे. या बाइकमध्ये फ्रंट एंड, स्कूप-आऊट सोलो सॅडल आणि मोकळे, झुकलेले रिअर फेंडर देण्यात आले आहे. इंधन टाकीवरील लूपिंग फ्रेम कंपनीच्या आधीच्या बाइकपेक्षा बरीच वेगळी राहणार आहे. ही बाइक हार्ले-डेव्हिडसनच्या क्रूझर मोटारसायकलसारखीच दिसते.
या इलेक्ट्रिक मोटारसायकलमध्ये फ्रेम म्हणून बॅटरी पॅकचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. बॅटरी कव्हर आणि मोटर दोन्ही आजूबाजूला बसवण्यात आले आहे. ज्या प्रमाणे हार्ले-डेव्हिडसनची इलेक्ट्रिक बाइक निर्माता कंपनी लाइव्हवायरने आपल्या एस २ मॉडेलप्रमाणेच रचना केली आहे. त्याच पद्धतीने या बाईकच्या उजव्या बाजूला बेल्ट ड्राइव्ह बसवण्यात आला आहे. तर दोन्ही बाजूला डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. बाईकच्या इमेजवरून असे दिसते की, यात स्विनगेमच्या वरच्या घटकाला जोडणारा एक मोनोशॉक देण्यात आला आहे.
या इलेक्ट्रिक मोटारसायकलचे मुख्य आकर्षण फ्रंट सस्पेंशन सेटअप आहे, जय ठिकाणी गर्डर फोर्क्स लावण्यात आले आहे. इलेक्ट्रिक ०१ कॉन्सेप्टमध्ये या प्रकारची रचना पाहायला मिळाली होती. गर्डर फोर्क्समध्ये दोन गर्डर आर्म्स असतात, या द्वारे बाइकची दोन्ही चाकं दोन्ही बाजूंनी धरली जातात. या मध्ये एक टॉप डॉगबोन असून ज्यामुळे बाईकची असेंब्ली मेनफ्रेमला फ्रंट फोर्कशी जोडली गेली आहे. रॉयल एनफिल्ड इलेक्ट्रिक बाईक डिझाइनला पेटंट प्रॉडक्शन-स्पेक मिळण्याची शक्यता नाही. त्याऐवजी रॉयल एनफिल्डसाठी आगामी ऑटो शोमध्ये सादर केली जाऊ शकते.