Stock market : 'या' कंपनीचे शेअर्स तुमच्याकडं असतील तर २ वर्षे अजिबात विकू नका! होऊ शकतो छप्परफाड नफा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stock market : 'या' कंपनीचे शेअर्स तुमच्याकडं असतील तर २ वर्षे अजिबात विकू नका! होऊ शकतो छप्परफाड नफा

Stock market : 'या' कंपनीचे शेअर्स तुमच्याकडं असतील तर २ वर्षे अजिबात विकू नका! होऊ शकतो छप्परफाड नफा

Nov 29, 2024 01:45 PM IST

NTPC Green Energy share target : एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये सातत्यानं वाढ होत असून पुढच्या दोन वर्षांत हा शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करू शकतो, असं तज्ज्ञांचा अंदाज आहे.

'या' कंपनीचे शेअर्स आता घ्या आणि दोन वर्षे शांत बसा! होऊ शकते छप्परफाड कमाई
'या' कंपनीचे शेअर्स आता घ्या आणि दोन वर्षे शांत बसा! होऊ शकते छप्परफाड कमाई

NTPC Green Energy Stock : एनटीपीसी लिमिटेडची हरित ऊर्जा उत्पादक कंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या शेअरची शेअर बाजारातील एन्ट्री निराशाजनक असली तरी त्यानंतर मात्र शेअर सुस्साट सुटला आहे. आयपीओच्या किंमतीच्या तुलनेत हा शेअर २२ टक्क्यांनी वाढला आहे. दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून हा शेअर खरेदी केल्यास गुंतवणूकदार मालामाल होऊ शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

बराच गाजावाजा झालेल्या एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या शेअरची बाजारातील एन्ट्री यथातथा होती. त्यानंतर गुंतवणूकदार हळूहळू त्याकडं वळले. कालच्या जोरदार तेजीनंतर आज, शुक्रवारी देखील हा शेअर ३ टक्क्यांहून अधिक वधारून १३२ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.

एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ १९ नोव्हेंबरला गुंतवणुकीसाठी खुला झाला होता. विक्रीच्या शेवटच्या दिवशी तो २.४ पट सब्सक्राइब झाला. १० हजार कोटी रुपयांच्या शेअर विक्रीसाठी किंमत पट्टा १०२ ते १०८ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता.

कंपनीवर तज्ज्ञांना विश्वास

कंपनीचे मजबूत फंडामेंटल आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील संभाव्य संधीचा हवाला देत शेअर मार्केट टुडेचे सहसंस्थापक व्हीएलए अंबाला यांनी एनटीपीसी ग्रीन एनर्जीबाबत विश्वास व्यक्त केला आहे. आयपीओ लागलेल्या गुंतवणूकदारांनी किमान दोन वर्षे हा शेअर होल्ड करावा. हा शेअर अल्पावधीत नव्हे तर दीर्घकाळात फायदा देऊ शकतो, असं अंबाला यांनी मिंटशी बोलताना सांगितलं. तीन ते सहा वर्षे प्रतीक्षा करू शकणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी या शेअरची टार्गेट प्राइस २५० ते ६०० रुपये असू शकते. 

इलारा सिक्युरिटीजनं देखील आता एनटीपीसी लिमिटेडच्या टार्गेट प्राइसमध्ये वाढ केली आहे. ब्रोकरेज कंपनीनं एनटीपीसीसाठी ५०५ रुपयांची नवी किंमत ठेवली आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner