दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरेच काही; कोणत्या कंपनीचा प्लान सर्वात स्वस्त? वाचा-relience jio vs airtel vs voda idea plans daily 3gb data unlimited voice calls and more ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरेच काही; कोणत्या कंपनीचा प्लान सर्वात स्वस्त? वाचा

दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरेच काही; कोणत्या कंपनीचा प्लान सर्वात स्वस्त? वाचा

Aug 03, 2024 02:55 PM IST

Daily 3GB Data Plans Details: एअरटेल, जिओ आणि व्हीआयच्या अशा सर्व प्लानबद्दल सांगणार आहोत, ज्यात दररोज ३ जीबी डेटा मिळतो. या प्लानची वैधता २८ ते ८४ दिवसांची आहे.

दररोज ३ जीबी डेटा असलेले प्रीपेड प्लान
दररोज ३ जीबी डेटा असलेले प्रीपेड प्लान

Relience Jio vs Airtel vs Voda- Idea: आज आम्ही तुम्हाला एअरटेल, जिओ आणि व्हीआयच्या अशा सर्व प्लानन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यात दररोज ३ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता २८ ते ८४ दिवसांची आहे. नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन आणि डिस्ने प्लस हॉटस्टार सारख्या ओटीटी बेनिफिट्ससह येणारे अनेक प्लान या लिस्टमध्ये आहेत. लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा देखील मिळते. 

दररोज ३ जीबी डेटा असलेले जिओचे प्रीपेड प्लान:

१. जिओचा ४४९ रुपयांचा प्रीपेड प्लान : हा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० एसएमएससह दररोज ३ जीबी डेटा मिळतो म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान ग्राहकांना एकूण ८४ जीबी डेटा मिळेल. या प्लानचे ग्राहक अनलिमिटेड 5जी डेटासाठी पात्र आहेत. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ क्लाऊड आणि जिओ सिनेमाचा अॅक्सेस मिळतो.

जिओचा ११९९ रुपयांचा प्रीपेड प्लान : हा प्लान ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० एसएमएससह दररोज ३ जीबी डेटा मिळतो म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान ग्राहकांना एकूण २५२ जीबी डेटा मिळेल. या प्लानचे ग्राहक अनलिमिटेड 5जी डेटासाठी पात्र आहेत. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ क्लाऊड आणि जिओ सिनेमाचा अॅक्सेस मिळतो.

जिओचा 1799 रुपयांचा प्रीपेड प्लान : हा प्लान 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० एसएमएससह दररोज ३ जीबी डेटा मिळतो म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान ग्राहकांना एकूण २५२ जीबी डेटा मिळेल. या प्लानचे ग्राहक अनलिमिटेड 5जी डेटासाठी पात्र आहेत. या प्लानमध्ये नेटफ्लिक्स (बेसिक) सब्सक्रिप्शनसह जिओ टीव्ही, जिओ क्लाऊड आणि जिओ सिनेमाचा अॅक्सेस मिळतो.

दररोज ३ जीबी डेटा असलेले एअरटेलचे प्रीपेड प्लान:

४. एअरटेलचा ४४९ रुपयांचा प्रीपेड प्लान : हा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० एसएमएससह दररोज ३ जीबी डेटा मिळतो म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान ग्राहकांना एकूण ८४ जीबी डेटा मिळेल. या प्लानचे ग्राहक अनलिमिटेड 5जी डेटासाठी पात्र आहेत. या प्लानमध्ये एअरटेल एक्सट्रीम प्ले (फ्री 20+ ओटीटी) सब्सक्रिप्शनसह अपोलो 24/7 सर्कल, फ्री हॅलोट्यून्स आणि फ्री विंक म्युझिक सारखे फायदे मिळतात.

एअरटेलचा ५४९ रुपयांचा प्रीपेड प्लान : हा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० एसएमएससह दररोज ३ जीबी डेटा मिळतो म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान ग्राहकांना एकूण ८४ जीबी डेटा मिळेल. या प्लानचे ग्राहक अनलिमिटेड 5जी डेटासाठी पात्र आहेत. या प्लानमध्ये अपोलो २४/७ सर्कल, फ्री हॅलोट्यून्स आणि फ्री विंक म्युझिक विथ डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाइल (३ महिन्यांसाठी) आणि एअरटेल एक्सट्रीम प्ले (फ्री २०+ ओटीटी) सब्सक्रिप्शन सारखे फायदे आहेत.

एअरटेलचा ८३८ रुपयांचा प्रीपेड प्लान : हा प्लान ५६ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० एसएमएससह दररोज ३ जीबी डेटा मिळतो म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान ग्राहकांना एकूण १६८ जीबी डेटा मिळेल. या प्लानचे ग्राहक अनलिमिटेड 5जी डेटासाठी पात्र आहेत. या प्लानमध्ये अॅमेझॉन प्राईम मेंबरशिप (५६ दिवसांसाठी) आणि एअरटेल एक्सट्रीम प्ले (फ्री २०+ ओटीटी) सब्सक्रिप्शन सह अपोलो २४/७ सर्कल, फ्री हॅलोट्यून्स आणि फ्री विंक म्युझिक सारखे फायदे मिळतात.

एअरटेलचा १७९८ रुपयांचा प्रीपेड प्लान : हा प्लान 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० एसएमएससह दररोज 3 जीबी डेटा मिळतो म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान ग्राहकांना एकूण 252 जीबी डेटा मिळेल. या प्लानचे ग्राहक अनलिमिटेड 5जी डेटासाठी पात्र आहेत. या प्लानमध्ये नेटफ्लिक्स (बेसिक) सब्सक्रिप्शनसह अपोलो २४/७ सर्कल, फ्री हॅलोट्यून्स आणि फ्री विंक म्युझिक सारखे फायदे आहेत.

वोडा-आयडियाचे दररोज ३ जीबी डेटा असलेले प्रीपेड प्लान:

८. व्हीआय ४४९ रुपयांचा प्रीपेड प्लान: हा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० एसएमएससह दररोज ३ जीबी डेटा मिळतो म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान ग्राहकांना एकूण ८४ जीबी डेटा मिळेल. प्लानमध्ये बिंज ऑल नाईट (रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अमर्यादित इंटरनेट), वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाइट (दरमहा मोफत २ जीबी बॅकअप डेटा) यासारखे फायदे आहेत.

9. व्हीआय ७५९ रुपयांचा प्रीपेड प्लान : हा प्लान ५६ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० एसएमएससह दररोज ३ जीबी डेटा मिळतो म्हणजेच संपूर्ण वैधतेदरम्यान ग्राहकांना एकूण १६८ जीबी डेटा मिळेल. प्लानमध्ये बिंज ऑल नाईट, वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिप्लीट सारखे फायदे आहेत.

विभाग