Prepaid Plans with 90 Days Validity: जर तुम्हाला वारंवार रिचार्जचा त्रास नको असेल आणि १००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत दीर्घ वैधता असलेल्या प्लानच्या शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला रिचार्ज प्लॅन्सबद्दल सांगत आहोत, जे ९० दिवसांच्या वैधतेसह येतात. या प्लानमध्ये तुम्हाला दीर्घ वैधतेसह अनलिमिटेड कॉलिंगसह भरपूर डेटा आणि एसएमएस मिळतात. तुमच्या सोयीसाठी आम्ही रिलायन्स जिओ आणि एअरटेल यांच्या ९० दिवसांच्या प्लानची तुलना केली आहे. पाहा कोणता प्लान तुमच्यासाठी सोयीस्कर आहे.
जिओचा ८९९ रुपयांचा प्रीपेड प्लान ९० दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानची सरासरी काढली तर हा प्लानसाठी दिवसाला फक्त ९.९८ रुपये खर्च आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज २ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. तसेच २० जीबी अतिरिक्त डेटा देखील मिळतो, ज्यामुळे एकूण डेटा २०० जीबी होतो. पण चांगली बाब म्हणजे, या प्लानचे ग्राहक अनलिमिटेड 5G डेटासाठी देखील पात्र आहेत. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस देखील आहे.
एअरटेलचा ९२९ रुपयांचा प्रीपेड प्लान आहे, ज्याची वैधता ९० दिवसांची आहे. किंमत आणि वैधतेनुसार प्लानची दैनंदिन किंमत फक्त १०.३२ रुपये आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १.५ जीबी डेटा (म्हणजेच एकूण १३५ जीबी) आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. या प्लानमध्ये एअरटेल एक्सट्रीम अॅप, अपोलो २४/७ सर्कल, फ्री हॅलोट्यून्ससारखे फायदे आहेत. या प्लानचे ग्राहक अनलिमिटेड 5G डेटासाठी पात्र नाहीत.
संबंधित बातम्या