Jio: जिओ युजर्ससाठी खास प्लान, दररोज ३ रुपये खर्च करून मिळवा अनलिमिटेड कॉलिंगसह फ्री डेटा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Jio: जिओ युजर्ससाठी खास प्लान, दररोज ३ रुपये खर्च करून मिळवा अनलिमिटेड कॉलिंगसह फ्री डेटा!

Jio: जिओ युजर्ससाठी खास प्लान, दररोज ३ रुपये खर्च करून मिळवा अनलिमिटेड कॉलिंगसह फ्री डेटा!

Oct 14, 2024 09:28 PM IST

Relience Jio Recharge Plan: रिलायन्स जिओने नुकताच लॉन्च केलेल्या नव्या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, भरमसाठ डेटासह बरेच काही मिळत आहे.

जिओ युजर्ससाठी खास प्लान
जिओ युजर्ससाठी खास प्लान

Relience Jio: रिलायन्स जिओकडून अनेक प्रीपेड प्लॅन दिले जातात, जे दीर्घ वैधतेसह येतात. दरम्यान, जिओफोन ग्राहकांसाठी काही निवडक प्लान उपलब्ध आहेत, जे इतर प्लानच्या तुलनेत स्वस्त आहेत. जिओने जिओफोन वापरकर्त्यांसाठी असा प्लान लॉन्च केला आहे, ज्याचा दररोज खर्च फक्त तीन रुपये आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि भरमसाठ डेटा मिळतो.

फीचर्स फोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी जिओफोन चांगला पर्याय आहे. जिओफोनची चांगली गोष्ट म्हणजे स्टँडर्ड प्लानच्या तुलनेत स्वस्त आहे. एवढेच नव्हेतर, हे डिव्हाइस महागड्या अँड्रॉइड फोनच्या तुलनेत खूप स्वस्त आहे.

जिओफोन ८९५ रुपयांचा प्लान

रिलायन्स जिओच्या प्रीपेड पोर्टफोलिओमधील जिओफोन ऑल इन वन प्लानच्या लिस्टमध्ये दीर्घ वैधता असलेला एकमेव प्लान ८९५ रुपयांचा आहे. या प्लानसोबत रिचार्ज केल्यास ३३६ दिवसांची वैधता मिळते. म्हणजेच ग्राहकांना दरमहा सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, ५० एसएमएस आणि २ जीबी डेटा मिळतो.

दिवसाला फक्त २ रुपये ६५ पैसे इतका खर्च

याशिवाय, या प्लानमध्ये ग्राहकांना जिओ टीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊडचा अ‍ॅक्सेस दिला जात आहे. ८९५ रुपयांच्या प्लानची सरासरी काढली तर ग्राहकांना दिवसाला फक्त २ रुपये ६५ पैसे इतका खर्च येतो. महत्त्वाचे म्हणजे, हा प्लान फक्त जिओफोन वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. तसेच या प्लानसोबत 5G चा अ‍ॅक्सेस मिळत नाही.

जिओफोनसाठी वापरकर्त्यांसाठी क्रिकेट अ‍ॅप लॉन्च

रिलायन्स जिओने जिओफोनसाठी एक नवीन जिओ क्रिकेट अ‍ॅप लॉन्च केले आहे. नवीन क्रिकेट अ‍ॅप लाइव्ह स्कोअर, मॅच अपडेट्स, बातम्या आणि व्हिडिओ आणि बरीच माहिती देईल. जिओक्रिकेट अ‍ॅप काईओएस अ‍ॅप स्टोअरद्वारे जिओफोन आणि जिओफोन २ वर डाउनलोड केले जाऊ शकते.

जिओक्रिकेट अ‍ॅप हिंदी, बांगला, मराठी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, गुजराती आणि इंग्रजी अशा नऊ भाषांमध्ये उपलब्ध आहे. अ‍ॅपमध्ये वेगवेगळ्या टॅबद्वारे वेगळे केलेले वेगवेगळे विभाग आहेत. अ‍ॅप उघडल्यावर वापरकर्त्यांना लाईव्ह सामन्याचे स्कोअर दर्शविणारा लाइव्ह स्कोअर सेक्शन दिसेल. होम स्क्रीनवर ट्रेंडिंग सेक्शन आणि गेम्स सेक्शन देखील आहे.

जिओ क्रिकेट अ‍ॅपमधील इतर विभाग बातम्या, गेम, व्हिडिओ आणि फिक्चर्ससाठी आहेत. जिओफोन वापरकर्ते या अ‍ॅपद्वारे जिओ क्रिकेट प्ले अलॉन्ग गेम देखील खेळू शकतात. जिओने गेल्या महिन्यात आयपीएल २०२० च्या अनुषंगाने हा गेम लॉन्च केला. या गेममध्ये वापरकर्त्यांना प्रत्येक चेंडूसाठी अंदाज सामायिक करणे आवश्यक आहे. जिओ क्रिकेट प्ले अलॉन्ग गेम माय जिओ अ‍ॅपद्वारे सर्व जिओ वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

 

Whats_app_banner