Relience Jio Recharge Plan: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे रिचार्ज प्लानचे अनेक पर्याय आहेत. जर तुम्ही १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा प्लान शोधत असाल, ज्यात अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री डेटा मिळतो तर, जिओचे हे प्लान तुमच्यासाठी आहेत. पण लक्षात ठेवा की हे प्लॅन जिओ फोन युजर्ससाठी आहेत. यासाठी तुमच्याकडे जिओ फोन असणे आवश्यक आहे. या प्लानबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
रिलायन्स जिओने नुकताच जिओफोन प्रिमा 4G हा नवीन फोन लॉन्च केला आहे, हा लेटेस्ट फोन अनेक जबरदस्त फीचर्स आणि आकर्षक डिझाइनसह येतो. या फोनची किंमत २ हजार ७९९ रुपये ठेवण्यात आली आहे.
जिओच्या १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या या प्लानची किंमत ७५ रुपये आहे. या प्लानमध्ये एकूण २३ दिवसांची वैधता मिळते. तसेच प्लानमध्ये युजर्संना दररोज १०० एमबी डेटा दिला जातो. यासोबत दररोज २०० एमबी डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये एकूण २३ दिवसांसाठी २.५ जीबी डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतर इंटरनेटस्पीड लिमिट ६४ केबीपीएसपर्यंत कमी होते. यासोबतच प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा दिला जातो. तसेच प्लानमध्ये ५० एसएमएसची सुविधा दिली जाते. इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाले तर युजर्संना या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाउड, जिओ सिक्युरिटीचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.
जिओफोन युजर्सकडे १२५ रुपयांचा प्लान आहे, ज्यात २३ दिवसांची वैधता आणि दररोज ०.५ जीबी डेटा मिळतो. जिओच्या या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि ३०० एसएमएस दिले जातात. तसेच प्लान युजर्संना जिओक्लाउड, जिओसिनेमा आणि जिओ टीव्हीचे सब्सक्रिप्शन देखील मिळते.
जिओचा यो प्लान ७२ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. प्लानमध्ये युजर्संना २० जीबी अतिरिक्त डेटा दिला जात आहे. या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड 5जी डेटा दिला जातो. रोज १०० फ्री एसएमएस देणाऱ्या या प्लानमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंगही मिळणार आहे. जिओचा हा प्लान जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाऊडचा फ्री अॅक्सेससह येतो.
हा प्लॅन ९० दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला डेली २ जीबी डेटासोबत २० जीबी एक्स्ट्रा डेटा फ्री मिळणार आहे. या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड 5जी डेटा देखील मिळणार आहे. या प्लानमध्ये दररोज १०० फ्री एसएमएस आणि देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. प्लानमध्ये तुम्हाला जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाचा फ्री अॅक्सेस मिळेल. जिओच्या या दोन्ही प्लानमध्ये तुम्हाला जिओ सिनेमा प्रीमियमचे सब्सक्रिप्शन मिळणार नाही.