Jio Fiber : जिओफायबरचा सर्वात स्वस्त प्लान; अनलिमिटेड डेटा, ८०० टीव्ही चॅनल्ससह व्हॉईस कॉलिंग फ्री!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Jio Fiber : जिओफायबरचा सर्वात स्वस्त प्लान; अनलिमिटेड डेटा, ८०० टीव्ही चॅनल्ससह व्हॉईस कॉलिंग फ्री!

Jio Fiber : जिओफायबरचा सर्वात स्वस्त प्लान; अनलिमिटेड डेटा, ८०० टीव्ही चॅनल्ससह व्हॉईस कॉलिंग फ्री!

Oct 07, 2024 04:51 PM IST

Jio Fiber Postpaid Plan: रिलायन्स जिओने जिओ फायबर पोस्टपेड सेवेचे कनेक्शन घेणाऱ्या नवीन युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे.

जिओफायबरचा सर्वात स्वस्त प्लान
जिओफायबरचा सर्वात स्वस्त प्लान

Relience Jio Diwali Offer: टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने खास दिवाळी धमाका ऑफर लॉन्च केली आहे, ज्याचा लाभ ग्राहक जिओ फायबर ब्रॉडबँड कनेक्शन मिळवण्यासाठी घेऊ शकतात. कंपनीने यापूर्वी सप्टेंबरमध्ये आपल्या वायरलेस ब्रॉडबँड सेवा जिओ एअरफायबरसाठी रिलायन्स डिजिटल दिवाळी धमाका ऑफर लॉन्च केली होती.  या ऑफरमुळे नवीन जिओ फायबर पोस्टपेड कनेक्शन घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना सूट आणि ओटीटी बेनिफिट्स मिळणार आहेत, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात येत आहेत.

नवीन जिओफायबर पोस्टपेड कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना ६ महिने किंवा १२ महिन्यांचे प्लान घेण्याचा पर्याय मिळत होता. परंतु नवीन दिवाळी धमाका ऑफरमुळे ग्राहकांना आता ३ महिन्यांचा प्लान मिळत आहे. म्हणजेच त्यांना वायफाय इन्स्टॉल करणे आणखी स्वस्त होणार असून विशेष ओटीटी बेनिफिट्स मिळणार आहेत. ग्राहक १०० एमबीपीएस किंवा ३० एमबीपीएस इंटरनेट स्पीडअसलेल्या प्लानसह रिचार्ज करू शकतात.

जिओफायबरचा तीन महिन्यांचा पोस्टपेड प्लॅन असलेला ३० एमबीपीएस प्लान २ हजार २२२ रुपयांत मिळणार आहे. या प्लानमध्ये ३० एमबीपीएसच्या डाउनलोड आणि अपलोड स्पीडसह अनलिमिटेड डेटा दिला जाणार आहे. तसेच मोफत व्हॉईस कॉलिंग आणि ८०० टीव्ही चॅनल्सचा अ‍ॅक्सेस मिळणार आहे. याशिवाय, जिओला ९० दिवसांसाठी या प्लानसोबत १०१ रुपयांचा १०० जीबी अतिरिक्त डेटा मोफत दिला जात आहे. याशिवाय ग्राहकांना डिस्ने+ हॉटस्टार, सोनी लिव्ह, झी ५, जिओसिनेमा प्रीमियम, सन एनएक्सटी, होईचोई, डिस्कव्हरी+, ऑल्ट बालाजी, इरॉस नाऊ, लायन्सगेट प्ले, शेमारूमी आणि ईटीव्ही विन (जिओ टीव्ही+ द्वारे) मोफत पाहता येणार आहे.

जिओफायबरचा १००  एमबीपीएस प्लान

ग्राहकांना १०० एमबीपीएस हाय स्पीड इंटरनेट हवे असेल तर दोन पोस्टपेड प्लान नव्या ऑफरचा भाग बनवण्यात आले आहेत आणि हे दोन्ही तीन महिन्यांच्या वैधतेसह येतात. पहिल्या प्लानची किंमत ३,३३३ रुपये असून १०० एमबीपीएस स्पीडसह अनलिमिटेड डेटा मिळतो. तसेच ८०० टीव्ही चॅनेल्सचा ही अ‍ॅक्सेस आहे. या प्लॅनसोबत ९० दिवसांची वैधता असलेल्या १५० रुपयांच्या प्लानमध्ये १५० जीबी डेटा मोफत मिळतो. 

४ हजार ४४४ रुपयांचा प्लान

दुसरा प्लान ४ हजार ४४४ रुपयांचा आहे, ज्यात ग्राहकांना १०० एमबीपीएस स्पीडसह अनलिमिटेड डेटा मिळतो आणि ८०० टीव्ही चॅनल्सचा अ‍ॅक्सेस दिला जात आहे. यापासून रिचार्ज केल्यास ९० दिवसांच्या वैधतेसह १९९ रुपयांचे २०० जीबी अतिरिक्त डेटा दिला जात आहे. या प्लॅनमध्ये ही आधीच्या रिचार्जसारखेच ओटीटी बेनिफिट्स मिळतात, पण त्यासोबत नेटफ्लिक्स बेसिक सब्सक्रिप्शन आणि अ‍ॅमेझॉन प्राइम लाइट सब्सक्रिप्शन दोन वर्षांसाठी मिळते.

ओटीटी बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाले तर,३ हजार ३३३ रुपयांच्या प्लानमध्ये डिस्ने+ हॉटस्टार, सोनी लिव्ह, झी 5, जिओसिनेमा प्रीमियम, सन एनएक्सटी, होईचोई, डिस्कव्हरी+, ऑल्ट बालाजी, इरॉस नाऊ, लायन्सगेट प्ले, शेमारूमे आणि ईटीव्ही विन (जिओ टीव्ही+ द्वारे) मधील कंटेंट पाहण्याचा पर्याय मिळेल.

Whats_app_banner