Jio ISD Plan: आता परदेशातही करा स्वस्तात कॉल, जिओने लॉन्च केले ७ नवे आयएसडी प्लान
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Jio ISD Plan: आता परदेशातही करा स्वस्तात कॉल, जिओने लॉन्च केले ७ नवे आयएसडी प्लान

Jio ISD Plan: आता परदेशातही करा स्वस्तात कॉल, जिओने लॉन्च केले ७ नवे आयएसडी प्लान

Updated Oct 18, 2024 03:13 PM IST

Relience Jio ISD Plan: रिलायन्स जिओने शुक्रवारी २१ देशांसाठी नवीन इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायलिंग म्हणजेच आयएसडी रिचार्ज प्लानची घोषणा केली.

जिओचे ७ नवे आयएसडी प्लान
जिओचे ७ नवे आयएसडी प्लान

Reliance Jio: रिलायन्स जिओने शुक्रवारी २१ देशांसाठी नवीन इंटरनॅशनल सबस्क्रायबर डायलिंग म्हणजेच आयएसडी रिचार्ज प्लानची घोषणा केली. रिलायन्स जिओने एकूण सात प्लान लॉन्च केले असून ग्राहकांना प्रत्येक रिचार्जमध्ये डेडिकेटेड ऑन-कॉल मिनिटे मिळतात. या प्लॅनची किंमत ३९ रुपयांपासून सुरू होते. हे प्लान प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. या योजना विशेषत: अशा ग्राहकांसाठी आहेत, जे आंतरराष्ट्रीय स्तरावर केवळ शॉर्ट कॉल करतात आणि त्यांच्यावर जास्त खर्च करू इच्छित नाहीत. कॉलिंग मिनिटांव्यतिरिक्त ग्राहकांना या प्लानमध्ये इतर कोणताही बेनिफिट मिळत नाही.

रिलायन्स जिओच्या नव्या मिनिट पॅकची किंमत ३९ रुपयांपासून सुरू होते. हे प्लान प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. चला तर मग जाणून घेऊया वेगवेगळ्या प्लानची किंमत आणि स्पेशालिटीबद्दल...

३९ रुपयांचा प्लान:

३९ रुपयांचा प्लान अमेरिका आणि कॅनडाला आंतरराष्ट्रीय कॉलसाठी उपलब्ध आहे आणि ३० मिनिटांचा कॉलिंग टाइम मिळतो. 

४९ रुपयांचा प्लान:

४९ रुपयांचा प्लान फक्त बांगलादेशात केलेल्या कॉलसाठी उपलब्ध आहे आणि २० मिनिटांचा कॉलिंग टाइम मिळतो.

५९ रुपयांचा प्लान:

 ५९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना सिंगापूर, थायलंड, हाँगकाँग आणि मलेशियामध्ये कॉल करता येणार असून १५ मिनिटे कॉलिंग ची सुविधा मिळते.

६९ रुपयांचा प्लान:

६९ रुपयांचा प्लान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये कॉल करणाऱ्या ग्राहकांसाठी असून १५ मिनिटे कॉलिंग ची वेळ मिळते.

७९ रुपयांचा प्लान: 

ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आणि स्पेनमध्ये कॉल करणाऱ्या ग्राहकांसाठी ७९ रुपयांचा प्लान असून १० मिनिटांचा कॉलिंग टाइम मिळतो.

८९ रुपयांचा प्लान: 

८९ रुपयांचा प्लान चीन, जपान आणि भूतानमध्ये कॉल करणाऱ्या ग्राहकांसाठी असून या प्लानमध्ये १५ मिनिटांचा कॉल टाइम मिळतो.

९९ रुपयांचा प्लान: युएई, सौदी अरेबिया, तुर्की, कुवैत आणि बहरीनमध्ये कॉल करणाऱ्या ग्राहकांसाठी असून १० मिनिटे कॉलिंग ची वेळ मिळते.

सर्व प्लानमध्ये सात दिवसांची वैधता

या रिचार्ज प्लानचा उद्देश ग्राहकांना ज्या क्षेत्राशी संबंधित व्हायचे आहे, त्या क्षेत्रासाठीच पैसे देण्यास मदत करणे हा आहे. सर्व रिचार्ज प्लॅनची वैधता ७ दिवसांची आहे. हे हायब्रीड प्लॅन सर्व जिओ प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाइल ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. तसेच, एखादा ग्राहक एखाद्या प्लॅनद्वारे आपला नंबर किती वेळा रिचार्ज करू शकतो याची कोणतीही मर्यादा नाही.

Whats_app_banner