Jio Prepaid Plans: खासगी टेलिकॉम कंपन्यांनी जुलैपासून आपल्या प्लानच्या किंमती वाढवल्या आहेत. सर्वच कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत २५ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. सध्या बाजारात रिलायन्स जिओ असे पाच प्लान उपलब्ध आहेत, त्यांची किंमत २५० रुपयांपेक्षा कमी आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना फ्री डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस यांसारख्या सुविधा मिळत आहे.
जिओच्या २०९ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्संना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. तसेच या प्लानमध्ये युजर्संना दररोज १ जीबी डेटा आणि १०० फ्री एसएमएसचा लाभ दिला जातो. रिलायन्स जिओचा हा रिचार्ज प्लान २२ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये युजर्संना एकूण २२ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचा अॅक्सेस मिळतो.
जिओच्या या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळते. या प्रीपेड रिचार्ज प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. यात युजर्संना एकूण २८ जीबी डेटाचा फायदा मिळतो. तसेच या प्लानमध्ये युजर्संना दररोज १०० एसएमएस मिळतात. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळतो.
जिओच्या १९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. या प्लानसोबत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे, जेणेकरून तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर केव्हाही बोलू शकता. १९९ रुपयांच्या या प्लानची वैधता १८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये एकूण २७ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचा अॅक्सेस कॉम्प्लिमेंटरी बेनिफिट म्हणून मिळतो.
जिओचा २५० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा आणखी एक प्लान आहे ज्यात युजर्संना दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. जिओच्या या प्लानची किंमत २३९ रुपये आहे. या प्लानमध्ये २२ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. या प्लानमध्ये युजर्संना एकूण ३३ जीबी डेटा मिळतो. युजर्सजिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचा ही लाभ घेऊ शकतात.
जिओचा २०० रुपयांपेक्षा कमीचा प्लान अशा युजर्ससाठी आहे ज्यांचा डेटा वापर जास्त आहे. कारण जिओच्या या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा ही मिळते. तसेच प्लानमध्ये दररोज १०० एसएमएसही दिले जातात. जिओच्या १९८ रुपयांच्या या प्लानची वैधता १४ दिवसांची आहे. म्हणजेच या प्लानमध्ये तुम्हाला एकूण २८ जीबी डेटा दिला जातो. या प्लानद्वारे रिचार्ज करणारे युजर्स जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचा ही लाभ घेऊ शकतात.