Best Value Plan: २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील बेस्ट व्हॅल्यू प्लान, जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांची चांदी-relience jio and airtel best value plan under 200 ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Best Value Plan: २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील बेस्ट व्हॅल्यू प्लान, जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांची चांदी

Best Value Plan: २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील बेस्ट व्हॅल्यू प्लान, जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांची चांदी

Oct 01, 2024 06:02 PM IST

Best Value Plan Under 200: रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या दोन्ही कंपन्या २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्रीपेड प्लान केले आहेत, ज्यात ग्राहकांना अधिक फायदा मिळत आहे.

एअरटेल आणि जिओचे बेस्ट व्हॅल्यू प्लान
एअरटेल आणि जिओचे बेस्ट व्हॅल्यू प्लान

Relience Jio and Airtel Best Value Plan: कमी किंमतीत चांगला प्लानची अपेक्षा करणाऱ्या ग्राहकांसाठी गूड न्यूज आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांकडून २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत बेस्ट व्हॅल्यू प्लान ऑफर केले जात आहेत. हे प्लान दीर्घ वैधता कालावधीसह येतात आणि ज्यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगव्यतिरिक्त डेटा मिळतो. तर, जिओ आणि एअरटेल यांच्यातील कोणता व्हॅल्यू लानमध्ये ग्राहकांना अधिक फायदे मिळत आहेत, हे जाणून घेऊयात.

भारती एअरटेलच्या ग्राहकांसाठी कंपनी १९९ रुपयांचा व्हॅल्यू प्लान देत आहे. या प्लानने रिचार्ज केल्यास २ जीबी डेटा मिळतो आणि २८ दिवसांची वैधता दिली जात आहे. याशिवाय, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा पर्याय उपलब्ध आहे. युजर्संना दररोज १०० एसएमएस पाठवता येतील. तसेच, विनामूल्य हॅलोट्यून्स उपलब्ध आहे आणि एअरटेल एक्सस्ट्रीमसह व्हिडिओ सामग्री स्ट्रीम केली जाऊ शकते.

रिलायन्स जिओ तीन वेगवेगळ्या किंमतीचे प्रीपेड प्लान ऑफर करते, त्यापैकी सर्वात स्वस्त १८९ रुपये आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची असून संपूर्ण वैधतेसाठी एकूण २ जीबी डेटा मिळत आहे. याशिवाय, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय, ग्राहकांना एकूण ३०० एसएमएसही मिळतात. या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊड अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळतो.

ज्या ग्राहकांना जास्त मोबाइल डेटाची आवश्यकता नाही. परंतु, दीर्घ वैधतेसाठी रिचार्ज करायचे आहे, त्यांच्यासाठी हे दोन्ही व्हॅल्यू प्लान सर्वोत्तम आहेत. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग मिळते. मात्र, या प्लॅनमधून रिचार्ज झाल्यास अनलिमिटेड 5G डेटाचा पर्याय नाही.

 

जिओफोन ७५ रुपयांचा प्लान

जिओच्या १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या या प्लानची किंमत ७५ रुपये आहे. या प्लानमध्ये एकूण २३ दिवसांची वैधता मिळते. तसेच प्लानमध्ये युजर्संना दररोज १०० एमबी डेटा दिला जातो. यासोबत दररोज २०० एमबी डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये एकूण २३ दिवसांसाठी २.५ जीबी डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतर इंटरनेटस्पीड लिमिट ६४ केबीपीएसपर्यंत कमी होते. यासोबतच प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा दिला जातो. तसेच प्लानमध्ये ५० एसएमएसची सुविधा दिली जाते. इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाले तर युजर्संना या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाउड, जिओ सिक्युरिटीचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

Whats_app_banner