वर्षभर चालणारा रिचार्ज प्लान शोधताय? जिओ, एअरटेल आणि बीएसएनएल ग्राहकांसाठी आहेत 'हे' पर्याय!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  वर्षभर चालणारा रिचार्ज प्लान शोधताय? जिओ, एअरटेल आणि बीएसएनएल ग्राहकांसाठी आहेत 'हे' पर्याय!

वर्षभर चालणारा रिचार्ज प्लान शोधताय? जिओ, एअरटेल आणि बीएसएनएल ग्राहकांसाठी आहेत 'हे' पर्याय!

Dec 27, 2024 05:40 PM IST

Best Annual Recharge Plans: कमी किंमतीत चांगल्या मूल्याचे आणि दीर्घ वैधता असलेल्या प्रीपेड प्लानच्या शोधात असलेल्या जिओ, एअरटेल आणि बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी चांगला पर्याय आहे.

लॉन्ग व्हॅलिडिटी असलेला प्लान शोधताय? जिओ, एअरटेल आणि बीएसएनएल ग्राहकांसाठी आहेत 'हे' पर्याय!
लॉन्ग व्हॅलिडिटी असलेला प्लान शोधताय? जिओ, एअरटेल आणि बीएसएनएल ग्राहकांसाठी आहेत 'हे' पर्याय!

Relience Jio, Airtel and BSNL Annual Plans: जर तुम्ही अशा मोजक्या ग्राहकांपैकी एक आहात, ज्यांना पुन्हा पुन्हा रिचार्ज करायला आवडत नाही, मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (व्हीआय) हे सर्व टेलिकॉम कंपन्यांनी वेगवेगळ्या किंमतींसह अनेक वार्षिक प्लान लॉन्च केले आहेत. ज्यामुळे ग्राहकांची वारंवार रिचार्ज करण्यापासून सुटका होणार आहे.

रिलायन्स जिओ

  • रिलायन्स जिओने ३३६ दिवस आणि ३६५ दिवसांच्या वैधतेसह व्हॅल्यू प्लान लॉन्च केले आहेत. ३३६ दिवसांची वैधता असलेल्या प्लानची किंमत ८९५ रुपये असून २४ जीबी डेटा मिळतो. यात अनलिमिटेड कॉलिंग, दर २८ दिवसांनी ५० एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचा फ्री अ‍ॅक्सेस मिळतो.
  • ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणारा कंपनीचा डेली डेटा प्लान ३ हजार ५९९ रुपयांचा आहे. यात दररोज २.५ जीबी डेटा दिला जात असून सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येते. तसेच दररोज १०० एसएमएस पाठविण्याचा पर्याय आहे. या प्लॅनमध्ये जिओ अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेसही मिळतो.

एअरटेल आणि व्हीआय

  • भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (व्हीआय) दोन्ही एकाच किंमतीत ३६५ दिवसांची वैधता असलेले प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लानची किंमत १ हजार ९९९ रुपये आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना एकूण २४ जीबी डेटा मिळतो. युजर्सना मेसेज पाठवण्याचा आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करण्याचा पर्याय दिला जात आहे.

बीएसएनएल

  • भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) २ हजार ९९९ रुपयांचा प्लान स्वस्तात देत आहे. या प्लानने रिचार्ज केल्यास दररोज ३ जीबी डेटा दिला जात असून यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा पर्याय दिला जात आहे. याशिवाय, दररोज १०० एसएमएस पाठवण्याचा पर्याय मिळत आहे.

रिलायन्स जिओचा ग्राहकांना झटका

रिलायन्स जिओने आपल्या १९ रुपये आणि २९ रुपयांच्या सर्वात स्वस्त डेटा व्हाउचर्सच्या वैधतेत मोठा बदल केला आहे. ३ जुलैपासून जिओने आपले सर्व प्लान महाग केले होते. या दरम्यान जिओने १५ रुपयांच्या डेटा व्हाउचरची किंमत १९ रुपये केली होती. तर, २५ रुपयांच्या प्लानची किंमत २९ रुपये केली होती. रिलायन्स जिओने १९ आणि २९ रुपयांच्या डेटा व्हाऊचर्सच्या वैधतेत बदल केला आहे. १९ रुपयांच्या व्हाउचरची वैधता आतापर्यंत युजरच्या बेस अॅक्टिव्ह प्लान इतकीच होती. जर युजरच्या बेस प्लानची वैधता ७० दिवसांची असेल तर, युजर ७० दिवसांसाठी १९ रुपयांचे डेटा व्हाउचर वापरू शकतो. आता ती कमी करून १ दिवस करण्यात आली आहे. म्हणजेच आता तुमच्याकडे फक्त १ दिवसासाठी वैध १९ रुपयांचे डेटा व्हाउचर असेल. तर, २९ रुपयांच्या डेटा व्हाउचरच्या बाबतीतही असेच घडले आहे, ज्यामध्ये युजरला बेस अॅक्टिव्ह प्लॅनपर्यंत वैधताही मिळाली आहे. पण आता रिलायन्स जिओचे २९ रुपयांचे डेटा व्हाउचर फक्त २ दिवसांसाठी वैध असेल.

Whats_app_banner