Jio: फक्त फोनवर बोलण्यासाठी रिचार्ज शोधताय? जाणून घ्या जिओच्या ‘या’ स्वस्त प्लानबद्दल!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Jio: फक्त फोनवर बोलण्यासाठी रिचार्ज शोधताय? जाणून घ्या जिओच्या ‘या’ स्वस्त प्लानबद्दल!

Jio: फक्त फोनवर बोलण्यासाठी रिचार्ज शोधताय? जाणून घ्या जिओच्या ‘या’ स्वस्त प्लानबद्दल!

Jan 07, 2025 04:05 PM IST

Relience Jio Affordable Talking Recharge: टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडून असे अनेक प्लॅन ऑफर केले जात आहेत, जे मर्यादित डेटासह लॉन्ग व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा देतात.

फक्त फोनवर बोलण्यासाठी रिचार्ज शोधताय? जाणून घ्या जिओच्या ‘या’ स्वस्त प्लानबद्दल!
फक्त फोनवर बोलण्यासाठी रिचार्ज शोधताय? जाणून घ्या जिओच्या ‘या’ स्वस्त प्लानबद्दल!

Relience Jio Recharge: टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना आपल्या ग्राहकांसाठी फक्त कॉलिंग आणि एसएमएस प्लान आणण्याचे निर्देश दिले आहेत. जर तुम्ही जिओचे ग्राहक आहात आणि केवळ कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट्स असलेल्या प्लानच्या शोधाताय? मग तुमच्यासाठी काही पर्याय आहेत. रिलायन्स जिओकडून तीन व्हॅल्यू प्लॅन ऑफर केले जात आहेत. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

ज्या ग्राकांना दैनंदिन डेटाची गरज नाही आणि ते वायफाय किंवा इतर सिमद्वारे डेटाची गरज पूर्ण करतात त्यांच्यासाठी हे प्लान उत्तम आहेत. या प्लानमध्ये ग्राहकांना मर्यादित डेटासह अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.

रिलायन्स जिओचे ३ व्हॅल्यू प्लान

  • १८९ रुपयांचा प्लान: जिओ युजर्संना १८९ रुपयांच्या व्हॅल्यू प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता आणि एकूण २ जीबी डेटा दिला जात आहे. याशिवाय, या वैधतेच्या कालावधीत एकूण ३०० एसएमएस पाठवता येणार असून सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. या रिचार्जवर ग्राहकांना जिओ फॅमिली अ‍ॅप्स जिओ टीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाउडचा अक्सेस मिळतो.
  • ४७९ रुपयांच्या प्लान: रिलायन्स जिओचा हा प्लान ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये ग्राहकांना एकूण ६ जीबी डेटा मिळतो. याशिवाय, ग्राहकांना एकूण १००० एसएमएस मिळतात आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा पर्यायही दिला जात आहे. या रिचार्जवर ग्राहकांना जिओ फॅमिली अ‍ॅप्स जिओ टीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाउडचा अक्सेस मिळतो.
  • १ हजार ८९९ रुपयांचा प्लान: हा जिओचा सर्वात महागडा व्हॅल्यू प्लान आहे, जो ३३६ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये ग्राहकांना एकूण २४ जीबी डेटा मिळतो आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येते. तसेच एकूण ३६०० एसएमएस पाठविण्याचा पर्यायही या प्लानसोबत उपलब्ध आहे. या रिचार्जवर ग्राहकांना जिओ फॅमिली अ‍ॅप्स जिओ टीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाउडचा अक्सेस मिळतो.

रिलायन्स जिओचा न्यू इयर प्लान

जिओने गेल्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये युजर्ससाठी न्यू इयर वेलकम प्लान २०२५ लॉन्च केला. वापरकर्ते ११ जानेवारी २०२५ पर्यंत या प्लानचे सब्सक्रिप्शन घेऊ शकतात. या प्लानमध्ये ग्राहकांना २०० दिवसांची वैधता मिळणार आहे. तसेच अनलिमिटेड कॉलिंग, दररोज २.५ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळतात. या प्लानसोबत कंपनी ग्राहकांना २ हजार १५० रुपयांपर्यंतचे फ्री बेनिफिट्स देत आहे.

 

Whats_app_banner