जिओचे ३६५ दिवस चालणारे ३ दमदार प्लान; दररोज २.५ जीबी, अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओ सिनेमा फ्री!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  जिओचे ३६५ दिवस चालणारे ३ दमदार प्लान; दररोज २.५ जीबी, अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओ सिनेमा फ्री!

जिओचे ३६५ दिवस चालणारे ३ दमदार प्लान; दररोज २.५ जीबी, अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओ सिनेमा फ्री!

Dec 20, 2024 12:17 AM IST

Jio 365 Days Recharge Plan: रिलायन्स जिओच्या ३६५ दिवसांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज २.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह जिओ सिनेमाचे फ्री सबस्क्रीप्शन मिळत आहे.

रिलायन्स जिओ: ३६५ दिवस चालणारे ३ दमदार प्लान
रिलायन्स जिओ: ३६५ दिवस चालणारे ३ दमदार प्लान

Jio Prepaid Plan: दीर्घ वैधता आणि दररोज २.५ जीबी डेटा असलेला प्लानच्या शोधत असलेल्या ग्राहकांसाठी जिओने ३ प्लान लॉन्च केले आहेत. कंपनीने नुकताच २०० दिवसांची वैधता असलेला प्लान लॉन्च केला आहे. हा प्लान देखील दीर्घ वैधतेसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. या तिन्ही प्लानमध्ये ग्राहकांना दररोज २.५ जीबी डेटा दिला जात आहे. याव्यतिरिक्त, अनलिमिटेड 5G डेटा देखील ऑफर करत आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना जिओ सिनेमाचा फ्री अ‍ॅक्सेस मिळत आहे.

जिओचा ३,५९९ रुपयांचा प्लान:

जिओचा हा प्लान ३६५ दिवसांसाठी चालतो. या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज २.५ जीबी डेटा मिळत आहे.  तसेच निवडक वापरकर्त्यांना अनलिमिटेड 5G डेटा देखील दिला जात आहे. अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगबेनिफिट असलेल्या या प्लानमध्ये तुम्हाला दररोज १०० फ्री एसएमएसही मिळतील. जिओच्या या प्लानमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाचा अ‍ॅक्सेस देखील मिळतो.

जिओचा ३,९९९ रुपयांचा प्लान:

३६५ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज २.५ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड 5जी डेटा देखील दिला जातो. प्लानमध्ये तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. या प्लानमध्ये दररोज १०० फ्री एसएमएसही मिळतात. या प्लॅनमध्ये फॅन कोड, जिओ सिनेमा आणि जिओ टीव्हीचा फ्री अ‍ॅक्सेस मिळतो. या प्लानमध्ये ग्राहकांना जिओ सिनेमा प्रीमियमचा फ्री अ‍ॅक्सेस मिळणार नाही.

जिओचा २,०२५ रुपयांचा प्लान:

जिओचा हा लेटेस्ट प्लान २००दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज २.५ जीबी डेटा मिळत आहे. विशेष म्हणजे, या प्लानमध्ये मर्यादित ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटादेखील दिला जात आहे. दररोज १०० फ्री एसएमएस देणाऱ्या या प्लानमध्ये देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंगही मिळणार आहे. या प्लानमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाचा फ्री अ‍ॅक्सेस मिळतो.

Whats_app_banner