Jio Postpaid Plan: १०० जीबीपर्यंत डेटा आणि नेटफ्लिक्स फ्री, ‘हे’ आहेत जिओचे ३ जबरदस्त पोस्टपेड प्लान
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Jio Postpaid Plan: १०० जीबीपर्यंत डेटा आणि नेटफ्लिक्स फ्री, ‘हे’ आहेत जिओचे ३ जबरदस्त पोस्टपेड प्लान

Jio Postpaid Plan: १०० जीबीपर्यंत डेटा आणि नेटफ्लिक्स फ्री, ‘हे’ आहेत जिओचे ३ जबरदस्त पोस्टपेड प्लान

Updated Oct 15, 2024 05:55 PM IST

Relience Jio 3 Best Postpaid Plans: रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी ३ पोस्टपेड लॉन्च केले आहेत.

रिलायन्स जिओचे पोस्टपेड प्लान
रिलायन्स जिओचे पोस्टपेड प्लान

Relience Jio Postpaid Plans: जिओच्या प्रीपेड प्लानमध्ये युजर्सला बेस्ट बेनिफिट्स दिले जात आहेत. प्रीपेड प्लॅनव्यतिरिक्त कंपनी आपल्या पोस्टपेड प्लॅनमध्ये युजर्सना जबरदस्त बेनिफिट्स देत आहे. आज आम्ही तुम्हाला जिओच्या ३ बेस्ट पोस्टपेड प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. यातील एक प्लान असाही आहे, ज्यामध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राईम लाइटचा फ्री अ‍ॅक्सेस मिळेल. त्याचबरोबर या प्लानमध्ये तुम्हाला जिओ सिनेमाचा फ्री अ‍ॅक्सेसही मिळणार आहे. या प्लानमध्ये कंपनी १०० जीबीपर्यंत डेटा आणि फ्री कॉलिंग देखील देत आहे.

जिओचा ४४९ रुपयांचा प्लान
हा जिओचा फॅमिली प्लान आहे. यामध्ये कंपनी तीन अतिरिक्त सिमही देत आहे. प्लानमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी ७५ जीबी डेटा दिला जात आहे. अ‍ॅड- ऑन सिम मध्ये प्लानमध्ये ५-५ जीबी अतिरिक्त डेटा मिळेल. प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड 5G डेटा देखील मिळणार आहे. प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० फ्री एसएमएस मिळतात. जिओच्या या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाचा फ्री अ‍ॅक्सेस देखील मिळतो. लक्षात ठेवा प्लानमध्ये तुम्हाला जिओ सिनेमा प्रीमियमचे सब्सक्रिप्शन मिळणार नाही. तसेच अ‍ॅड-ऑन सिमसाठी दरमहिन्याला १५० रुपये खर्च करावे लागतील.

जिओचा ६४९ रुपयांचा प्लान

कंपनीचा हा वैयक्तिक प्लान अनलिमिटेड डेटा ऑफर करतो. यात युजर्संना अनलिमिटेड 5G डेटा देखील मिळणार आहे. जिओच्या या प्लानमध्ये दररोज १०० फ्री एसएमएस मिळतात. यामध्ये तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंगही मिळणार आहे. कंपनी या प्लानमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाचा फ्री अ‍ॅक्सेस देत आहे. लक्षात ठेवा या प्लानमध्ये जिओ सिनेमाचे फक्त बेसिक सब्सक्रिप्शन दिले जात आहे.

जिओचा ७४९ रुपयांचा प्लान

जिओचा हा फॅमिली पोस्टपेड प्लान तीन अतिरिक्त सिमसोबत येतो. इंटरनेट वापरण्यासाठी १०० जीबी डेटा दिला जात आहे. कंपनी फॅमिली सिममध्ये दरमहा ५-५ जीबी अतिरिक्त डेटा ही देत आहे. या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड 5G डेटा देखील मिळणार आहे. रोज १०० फ्री एसएमएस देणाऱ्या या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगबेनिफिट मिळतो. या प्लानमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स (बेसिक), अ‍ॅमेझॉन प्राइम लाइट (२ वर्षांची वैधता), जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमाचा फ्री अ‍ॅक्सेस मिळेल. अतिरिक्त सिमसाठी तुम्हाला दरमहा १५० रुपये खर्च करावे लागतील. या प्लॅनमध्ये जिओ सिनेमाचे नॉर्मल सब्सक्रिप्शनही मिळते.

Whats_app_banner