मराठी बातम्या  /  business  /  IPL RIL plan : फुकटात पहा आयपीएल मॅचेस, क्रिकेटप्रेमीसाठी रिलायन्सचा जबरदस्त प्लान !
IPL HT
IPL HT

IPL RIL plan : फुकटात पहा आयपीएल मॅचेस, क्रिकेटप्रेमीसाठी रिलायन्सचा जबरदस्त प्लान !

11 January 2023, 19:15 ISTKulkarni Rutuja Sudeep

IPL RIL plan : क्रिकेटप्रेमींना आता आयपीएलच्या मॅचेस फुकटात पाहता येणार आहे. रिलायन्स कंपनीने आयपीएल प्रेमींसाठी ही अनोखी आँफर देण्याची तयारी केली आहे. काय आहे ही आॅफर,जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा -

IPL RIL plan : क्रिकेटप्रेमींना आता आयपीएलच्या मॅचेस फुकटात पाहता येणार आहे. रिलायन्स कंपनीने आयपीएल प्रेमींसाठी ही अनोखी आँफर देण्याची तयारी केली आहे. द हिंदू बिझनेसलाईनच्या अहवालानुसार, जिओ सिनेमा अॅपवर फिफा वर्ल्डकर २०२२ चे प्रसारण मोफत केल्यानंतर रिलायन्स इंडियन प्रिमियर लिगच्या २०२३ सीझनच्या प्रसारणासाठी हेच माॅडेल कामय ठेवण्याची शक्यता आहे. रिलायन्स संलग्न वायकाॅम १८ ने गेल्यावर्षी २०२३ - २७ सीझनसाठी २३, ७५८ कोटी रुपयांमध्ये डिजीटल मिडिया राईट्सची खरेदी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वायकाॅम १८ लाईव्ह स्पोर्ट्स स्ट्रिमिंग मार्केटला धोका पोहोचवणाऱ्या अनेक अनेक योजनांच्या शोधात आहेत. बाजारपेठेतील आपला हिस्सा वाढवण्यासाठी कंपनी अनेक मोफत योजना, उत्पादने जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. उच्च एचडी गुणवत्तेसाठी सबस्क्रिप्शन पॅकेज सुरु ठेवणार आहे.

प्रादेशिक भाषांमध्येही आयपीएलची मजा

रिलायन्स कंपनी आयपीएलचे प्रसारण प्रादेशिक भाषांमध्ये दाखवण्याची योजना आखत आहे. मोफत आयपीएल मॅचेस पाहण्यासाठी जिओ टेलिकाॅम सब्स्क्रिप्शन पॅकेजसह देण्याची योजना आहे. काही ठिकाणी प्रतिस्पर्धी टेलिकाॅम कंपन्यांच्या यूजर्सना त्यांच्या मोबाईल प्लान्सवर जिओ सिनेमावर मोफत प्रसारणाचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. या कॅटेगरीमध्ये रिलायन्सचा सामना डिस्ने प्लस हाॅटस्टार्सशी आहे. कारण त्यांच्याकडे आयपीएलच्या डीटीएच प्रसारणाचे हक्क आहेत. तज्त्रांच्या मते, रिलायन्सच्या या स्ट्रॅटेजीमुळे मोठ्या संख्येने प्रेक्षकवर्ग आयपीएल मॅचेस पाहण्यासाठी आकर्षित होईल.