मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Jio Prepaid Plan: जिओच्या ३९८ रुपयांच्या प्लानमध्ये १२ ओटीटी फ्री, एक्स्ट्रा डेटाही मिळणार!

Jio Prepaid Plan: जिओच्या ३९८ रुपयांच्या प्लानमध्ये १२ ओटीटी फ्री, एक्स्ट्रा डेटाही मिळणार!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 06, 2024 04:02 PM IST

Reliance Jio Recharge: रिलायन्स जिओने नव्या रिचार्जची घोषणा केली आहे.

Reliance JIO
Reliance JIO

Reliance Jio Prepaid Plans: वेब सिरीज, चित्रपट किंवा मालिका पाहण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन असणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी ग्राहकांना मोठी रक्कम खर्च करावी लागेल. दरम्यान, रिलायन्स जिओने खास प्लान आणला आहे, ज्यात ग्राहकांना एका रिचार्जमध्ये १२ ओटीटी प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. या प्लानबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रिलायन्स जिओ वापरकर्त्यांना अनेक प्लानमध्ये १४ ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंत सबस्क्रिप्शन मिळत आहे. जिओच्या प्रीमियम प्लानमध्ये ४०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत ग्राहकांना दैनंदिन डेटासह ६ जीबी अतिरिक्त डेटा मिळतो.

Smartphone Prices : स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर जूनच्या आधीच घ्या, कारण...

जिओचा ३९८ रुपयांचा प्लान

जिओच्या या प्लानची ​​वैधता २८ दिवस आहे. याशिवाय २ जीबी दैनिक डेटानुसार एकूण ५२ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस सारखे फायदे देखील मिळतात.

 

१२ ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळणार

जिओ ग्राहकांना या प्लानमध्ये SonyLIV, ZEE5, JioCinema Premium, Lionsgate Play, Discovery+ आणि Sun NXT व्यतिरिक्त Kanchha Lannka, Planet Marathi, Chaupal, DocuBay, EPIC ON आणि Hoichoi चे सबस्क्रिप्शन मिळते. या प्लानमध्ये JioTV आणि JioCloud या अॅप्सचे अॅक्सेस मिळते.

WhatsApp channel

विभाग