मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Jio Prepaid Plan: जिओचा १४८ रुपयांचा धमाकेदार प्लॉन; १२ ओटीटी प्लेटफॉर्मसह भरमसाठ डेटा मिळणार!

Jio Prepaid Plan: जिओचा १४८ रुपयांचा धमाकेदार प्लॉन; १२ ओटीटी प्लेटफॉर्मसह भरमसाठ डेटा मिळणार!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 04, 2024 08:42 PM IST

Reliance Jio Recharge: रिलायन्स जिओने त्यांच्या ग्राहकांनासाठी १४८ रुपयांचा धमाकेदार प्लॉन आणला आहे.

Jio Recharge
Jio Recharge

Jio Prepaid Recharge: चित्रपट, वेब सिरीज किंवा इतर व्हिडिओ कंटेंट पाहण्यासाठी वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागते. परंतु, विविध प्लॅटफॉर्मचे वेगळे सबस्क्रिप्शन घेतल्यास ग्राहकांना अधिक पैसे खर्च करावे लागतात. अशा ग्राहकांसाठी रिलायन्स जिओने १४८ रुपयांचा धमाकेदार प्लॉन आणला आहे. या प्लॉनमध्ये ग्राहकांना १२ ओटीटी प्लॅटफॉर्मसह भरमसाठ डेटा मिळणार आहे.

रिलायन्स जिओचा हा प्लानमध्ये जिओ टीव्ही प्रीमिअमसोबत येत आहे. जिओच्या या प्लॉनमध्ये १४८ रुपयांत १० जीबी डेटा आणि डेटा व्हाउचर मिळणार आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. हा प्लानसाठी ग्राहकांकडे कंपनीचा एक एक्टिव्ह प्रीपेड प्लान असणे गरजेचे आहे.

या प्लानमध्ये सोनी लिव, झी ५, जिओ सिनेमा प्रिमिअम, लायनगेट प्ले, डिस्कव्हरी प्लस, सन एनएक्सटी, कंच्छा लंका, प्लॅनेट मराठी, चौपाल, डॉक्युबे, एपिक ऑन आणि होईचोईचा मोफत सबस्क्रिप्शन मिळते, जे जिओ टीव्ही अॅपद्वारे पाहू शकतात. तसेच २८ दिवसांसाठी जिओसिनेमा प्रीमिअमचा सबस्क्रिप्शन मिळते, ज्याचे कूपन मायजिओ अकाऊंटमध्ये क्रेडीट केले जाईल.

रिलायन्स जिओचा ४०० रुपयांचा प्रीपेड प्लान

रिलायन्स जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी ३९८ रुपयांचा स्वस्त प्लॅन आणला आहे. या रिचार्जमध्ये ग्राहकांना एक किंवा दोन नव्हेतर १२ ओटीटी प्लॅटफॉर्मची सदस्यता मिळत आहे. या प्लॅनची मर्यादा २८ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा मिळते. तसेच प्रीपेड प्लॅनसह ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस पाठवण्याचा पर्याय देखील मिळतो.

WhatsApp channel

विभाग