Jio चा न्यू ईयर धमाका..! लाँच केला Happy New Year 2025 जबरदस्त रिचार्ज प्लॅन, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Jio चा न्यू ईयर धमाका..! लाँच केला Happy New Year 2025 जबरदस्त रिचार्ज प्लॅन, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

Jio चा न्यू ईयर धमाका..! लाँच केला Happy New Year 2025 जबरदस्त रिचार्ज प्लॅन, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

Dec 11, 2024 05:34 PM IST

Jio New Year Welcome Plan 2025 : जिओच्या या नव्या रिचार्ज प्लॅनची किंमत २०२५ रुपये असून हा खासकरून मोबाइल यूजर्ससाठी उपलब्ध करण्यात आला आहे. यामध्ये ग्राहकांना ४३०० रुपयांचे फायदे मिळणार आहेत.

जिओचा न्यू ईअर रिचार्ज प्लॅन
जिओचा न्यू ईअर रिचार्ज प्लॅन

Jio Happy New Year 2024 Plan: रिलायन्स जिओने आपल्या दरवर्षीच्या न्यू ईयर प्लानची परंपरा कायम ठेवत यंदाही जबरदस्त प्लॅन आणला आहे. रिलायन्स जिओने आपला न्यू ईयर वेलकम प्लॅन लाँच केला आहे. जिओचा नवा New Year Welcome Plan मर्यादित काळासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मालकीच्या जिओच्या या रिचार्ज पॅकची किंमत २०२५ रुपये आहे. २०२५ च्या किंमतीत ग्राहकांना ४३०० रुपयांचे फायदे मिळणार आहे. तर जाणून घेऊया या रिचार्ज प्लॅनबाबत.. 

२०२५ रुपयांचा रिलायन्स जिओ न्यू ईयर वेलकम प्लान - (JIO NEW YEAR WELCOME PLAN)

  • जिओच्या या नव्या रिचार्ज प्लॅनची किंमत २०२५ रुपये असून हा खासकरून मोबाइल यूजर्ससाठी उपलब्ध करण्यात आला आहे. 
  • जिओच्या या प्लॅनची व्हॅलिडिटी २०० दिवस आहे. या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना प्रतिदिन २.५ जीबी डेटा ऑफर केला जात आहे. 
  • यूजर्स एकूण ५०० जीबी ४ जी डेटा या प्लॅनमध्ये वापरू शकणार आहेत. 
  • जिओ ग्राहकांना या रिचार्ज पॅकमध्ये अनलिमिटेड 5G नेटवर्कची सुविधा मिळणार आहे. 
  • जिओच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100SMS प्रत्येक दिवशी ऑफर केले जातील. 
  • या रिचार्ज पॅकमध्ये २१५० रुपयांचे पार्टनर कूपन मिळतात.
  • ५०० रुपयांचे AJIO कूपन मिळतील, जे २५०० रुपयांच्या वरती खरेदीवर वापरता येतील.
  • १५० रुपयांचे स्विगी कूपन जे ग्राहक कमीत कमी ४९९ च्या ऑर्डरवरती वापरू शकतात.
  •  विमान प्रवास बुकिंगसाठी १५०० रुपयांचे EaseMyTrip कूपन

जिओच्या या प्लॅनची मुदत - 

  •  जिओच्या या न्यू ईअर रिचार्ज प्लॅनची मुदत एक महिना म्हणजेच ११ डिसेंबर २०२४ ते ११ जानेवारी २०२५ पर्यंत आहे. 

जिओ फोन युजर्ससाठी ८९५  रुपयांचा रिचार्ज प्लॅन -

जिओने एक चांगला प्लॅन बाजारात आणला आहे. या प्लॅनची किंमत फक्त ८९५  रुपये असून हा प्लॅन खास जिओ फोन युजर्ससाठी आहे. या प्लॅनची वैधता ३३६ दिवसांची आहे. याचा अर्थ तुम्हाला जवळपास ११ महिने रिचार्ज करावे लागणार नाही. हा प्लॅन स्मार्टफोन युजर्ससाठी नाही. 

केवस व्हाईस कॉलिंगसाठी हा प्लॅन उत्तम आहे. मात्र यात एकूण २४GB डेटा मिळेल, जो बेसिक इंटरनेट वापरासाठी पुरेसा आहे. परंतु जास्त डेटा वापरणाऱ्या युजर्ससाठी हा प्लॅन योग्य नाही. तसेच यात ५ जीचा समावेश नाही. या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचा विनामूल्य अ‍ॅक्सेससह काही अन्य फायदे मिळू शकतात.

Whats_app_banner