Reliance Jio: रिलायन्स जिओचा भारतात सर्वात मोठा युजरबेस असून त्याची इतर कंपन्यांशी स्पर्धा पाहायला मिळते. जिओ असे अनेक प्लॅन ऑफर करत आहे, ज्यात बाकीच्या कंपन्यांना पर्याय नाही. आज आम्ही जिओच्या सर्वात स्वस्त डेली डेटा प्लॅनची माहिती देणार आहोत, ज्यासोबत ओटीटीचा फायदा मोफत आहे.
जिओकडून ज्या रिचार्ज प्लॅनमध्ये स्वस्त ओटीटी बेनिफिट्स दिले जात आहेत, त्यातील अनेक प्लॅनमध्ये फक्त डेटा दिला जातो. केवळ अतिरिक्त डेटासाठी रिचार्ज करताना प्रत्येक युजरला ओटीटीचा फायदा घ्यायचा असेलच असे नाही. अशावेळी डेली डेटासोबत ओटीटीचा फायदा देणाऱ्या सर्वात स्वस्त प्लानची किंमत ३२८ रुपये आहे.
जिओचा हा प्लॅन २८ दिवसांच्या वैधतेसह येतो आणि संपूर्ण वैधता कालावधीसाठी दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. याशिवाय, सर्व टेलिकॉम नेटवर्कवर ग्राहक हवे तेवढा वेळ व्हॉईस कॉलिंग करू शकतात. या प्लानमध्ये युजर्संना दररोज १०० एसएमएस पाठवण्याचा पर्याय ही देण्यात आला आहे.
केवळ २८ दिवसांची वैधता असलेल्या या रिचार्ज प्लॅनमध्ये जिओ युजर्संना संपूर्ण तीन महिन्यांसाठी डिस्ने+ हॉटस्टार ओटीटी सेवेचे मोबाइल सब्सक्रिप्शन दिले जात आहे. डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सब्सक्रिप्शनसह, आपण चित्रपट, टीव्ही शो आणि क्रिकेट सामन्यांचा आनंद घेऊ शकता. हा कंटेंट मोबाइल किंवा टॅब्लेट स्क्रीनवर पाहता येतो.
जे युजर्स कमी डेटा वापरतात आणि अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएससह ओटीटीचा आनंद घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा प्लॅन चांगला आहे. प्लानसोबत जिओ अॅप्सचा अॅक्सेसही मिळतो. या प्लानमध्ये युजर्ससाठी अनलिमिटेड 5जी डेटाचा अॅक्सेस देखील मिळतो.
टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने यावर्षी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने नवीन वायरलेस वायफाय सेवा जिओ एअरफायबर लाँच केली, ज्याचा फायदा आता २५० हून अधिक शहरांमध्ये होत आहे. या सेवेमुळे केबल नेटवर्क न टाकता हायस्पीड 5G कनेक्टिव्हिटीचा लाभ दिला जात आहे. विशेष म्हणजे कंपनी त्याचे कनेक्शन पूर्णपणे मोफत देत आहे.
संबंधित बातम्या