Jio Cheapest Recharge Plans: भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ नेहमीच त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लान आणत असते. यावेळी देखील जिओने आपल्या यूजर्ससाठी एक मोठी भेट आणली आहे. जिओने आपले दोन डेटा बूस्टर प्लान बाजारात आणले आहेत, जे कंपनीचे आतापर्यंतचे सर्वात स्वस्त प्लान आहेत.
जिओने १९ आणि २९ रुपयांचे दोन प्रीपेड प्लान लॉन्च केले आहेत. ग्राहकांचा दैनंदिन डेटा प्लान संपल्यानंतर ते यापैकी एक प्लान रिचार्ज करून इंटरनेट वापरू शकतात. या दोन्ही प्लानची वैधता जिओच्या स्टँडर्ड प्रीपेड प्लॅन इतकीच असेल.
जिओने १९ रुपयांचा रुपयांचा डेटा प्लान लॉन्च केला आहे, ज्यात ग्राहकांना १.५ जीबी डेटा मिळतो. जिओ ग्राहकांना १५ रुपयांचा डेटा प्लान देखील ऑफर करते, ज्यामध्ये ग्राहकांना १ जीबी डेटा मिळतो. अशातच ग्राहक चार रुपये अधिक खर्च करून ५०० एमबी जास्त मिळवू शकतात.
जिओने आणखी एक डेटा प्लॅन बाजारात आणला आहे. हा डेटा प्लान २९ रुपयांचा आहे, ज्यात ग्राहकांना २.५ जीबी डेटा मिळतो. याशिवाय, कंपनीचा २५ रुपयांचा डेटा प्लान बाजारात उपलब्ध आहे. परंतु, या प्लानमध्ये ग्राहकांना २ जीबी डेटा मिळतो. मात्र, फक्त चार रुपये अधिक खर्च केल्यास ग्राहकांना ५०० अधिक डेटा मिळतो.
ज्या ग्राहकांना कमी बजेटमध्ये इंटरनेट वापरायचे आहे, त्यांच्यासाठी हे नवीन डेटा पॅक महत्त्वाचे आहेत. या पॅकसह ग्राहकांना जास्त खर्च न करता त्यांच्या मोबाइलवर इंटरनेट वापरू शकतात.