Jio AirFiber: फुकटात जिओ एअरफायबरचं कनेक्शन मिळवण्यासाठी काय करायचं? वाचा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Jio AirFiber: फुकटात जिओ एअरफायबरचं कनेक्शन मिळवण्यासाठी काय करायचं? वाचा

Jio AirFiber: फुकटात जिओ एअरफायबरचं कनेक्शन मिळवण्यासाठी काय करायचं? वाचा

Jan 20, 2024 06:09 PM IST

How to Get Jio Airfiber Free Connection: हाय स्पीड इंटरनेटचा आनंद घेण्यासाठी जिओ एअरफायबर हा चांगला पर्याय आहे.

Jio Airfiber
Jio Airfiber

Jio AirFiber Free Connection: रिलायन्स जिओची एअरफायबर सेवा देशभरातील जवळपास ४ हजार शहरांपर्यंत पोहोचली आहे. हाय स्पीड इंटरनेटचा आनंद घेण्यासाठी जिओ एअरफायबर हा चांगला पर्याय आहे. रिलायन्स जिओने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जिओ एअरफायबरची घोषणा केली होती. काही महिन्यातच जिओ फायबर सेवा देशातील ३ हजार ९३९ शहरांपर्यंत पोहोचली. जिओ एअर फायबरचा प्लान ५९९ पासून सुरु होतो. जिओ एअरफायबरच्या प्रत्येक प्लानमध्ये ग्राहकांना ओटीटी आणि टीव्ही चॅनलसारखे बेनिफिट्स मिळतात. दिर्घ वैधता असलेल्या प्लान शोधणाऱ्या ग्राहकांना फुटकात इन्स्टॉलेशन देत आहे. दरम्यान, जिओ एअर फायबरचे कनेक्शन फुकटात कसे मिळवायचे? हे जाणून घेऊयात.

जिओ एअरफायबरच्या सेटअपमध्ये ग्राहकांना इनडोर आणि आऊटडोर युनिटचा समावेश आहे. आऊटडोर युनिटला घराबाहेर किंवा छतावर लावता येऊ शकते. तर, इनडोर युनिटला घरात किंवा ऑफिसमध्ये लावले जाऊ शकते. कंपनी इन्स्टॉलेशनचे १००० रुपये चार्ज करते. परंतु, जे ग्राहक वार्षिक प्लान घेतात त्यांना फुकटात जिओ एअरफायबरचे कनेक्शन मिळत आहे. ग्राहक वार्षिक प्लान ईएमआयवर देखील घेतला जाऊ शकतो.

जिओ एअरफायबर कनेक्शन कसे मिळवायचे?

जिओ एअरफायबर सर्विसला व्हॉट्सअपद्वारे बूक करण्यासाठी ग्राहकांना ६०००८- ६०००८ मिस्ड कॉल देऊ शकतात. याशिवाय, कंपनीची अधिक वेबसाईट किंवा जवळच्या जिओ स्टोरमध्ये जाऊन जिओ एअर फायबरचे कनेक्शन घेऊ शकतो. जिओ एअर फायबरची सुविधा तु्मच्या शहरात सुरू आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी https://www.jio.com/jcms/airfiber/ वर क्लिक करा. सर्विसमध्ये ग्राहकांना वाय-फाय राउटरसह 4K स्मार्ट सेट अप बॉक्स आणि व्हॉइट अ‍ॅक्टिव्ह रिमोट मिळतो.

व्होडाफोनच्या 'या' प्लानसमोर जिओ- एअरटेल फेल; अवघ्या १५१ रुपयांत हॉट स्टॉर सब्सक्रिप्शनसह बरंच काही!

जिओ एअरफायबर सर्वात स्वस्त प्लान

हा प्लान ३० दिवसांच्या वैधतेसह येतो. ग्राहक हा प्लान ६ महिने किंवा १२ महिन्यासाठी घेऊ शकतात. या प्लानमध्ये ग्राहकांना १००० जीबी डेटापर्यंत ३० एमबीपीएस स्पीड मिळते. डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड ६४ केबीपीएस होईल. या प्लानमध्ये ग्राहकांना ५५० चॅनेल्ससह १३ फी ओटीटी सब्सक्रिप्शन मिळते. ओटीटी सब्सक्रिप्शनमध्ये जिओ सिनेमा, सोनी लिव, डिज्नी प्लस हॉटस्टार, लायन्सगेट प्ले, झी५, डिस्कव्हरी प्लस, होईचोई, सन एनएक्सटी, शेमारूमी, डॉक्यूबे, एएलटी बाजाली, इरोस नाऊ, एपिक ऑनचा समावेश आहे.

Whats_app_banner