Reliance Jio: दरवाढीनंतर जिओचा ग्राहकांना आणखी एक धक्का; गुपचूप बंद केले ‘हे’ सर्वात स्वस्त प्लान!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Reliance Jio: दरवाढीनंतर जिओचा ग्राहकांना आणखी एक धक्का; गुपचूप बंद केले ‘हे’ सर्वात स्वस्त प्लान!

Reliance Jio: दरवाढीनंतर जिओचा ग्राहकांना आणखी एक धक्का; गुपचूप बंद केले ‘हे’ सर्वात स्वस्त प्लान!

Jul 08, 2024 05:52 PM IST

Reliance Jio Removed popular prepaid plans: नुकतीच रिलायन्स जिओने ३ जुलै २०२४ रोजी आपल्या रिचार्जच्या किंमतीत वाढ केली होती. दरवाढीला आठवडा उलटला नाही तोच कंपनीने दोन सर्वात स्वस्त प्लान बंद केले.

रिलायन्स जिओच्या ग्राहकांना मोठा धक्का
रिलायन्स जिओच्या ग्राहकांना मोठा धक्का

Reliance Jio prepaid plans: भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला. कंपनीने १४९ आणि १७९ रुपयांचे प्रीपेड रिचार्ज प्लान बंद केले आहेत. दरवाढीनंतर जिओने हे दोन्ही प्लान सुरु ठेवले. परंतु, त्यांची वैधता कमी केली. मात्र, आता कंपनीने हे दोन्ही प्लान बंद केले आहेत. यामुळे सिमकार्ड अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

जिओ १४९ रुपयांचा प्लान

जिओच्या या मोबाइल प्रीपेड रिचार्ज प्लानची वैधता २० दिवसांची होती. या प्लानमध्ये ग्राहकांन १ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सुविधा मिळत होती. दरवाढीनंतर कंपनीने या प्लानची वैधता ६ दिवसांनी कमी करून १४ दिवसांची केली.

जिओ १७९ रुपयांचा प्लान

जिओच्या १७९ रुपयांच्या प्रीपेड प्लानची वैधता २४ दिवसांची होती. या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस दिले जात होते. आता या प्लॅनची वैधता ६ दिवसांनी कमी करण्यात आली होती.

दरवाढीनंतर जिओचा सर्वात स्वस्त प्लान

रिलायन्स जिओचा नवा मिनिमम व्हॅलिडिटी रिचार्ज प्लान आता १८९ रुपयांचा आहे. एअरटेलच्या १९९ रुपयांच्या प्लानपेक्षा फक्त १० रुपयांनी स्वस्त आहे. रुपये स्वस्त आहे. जिओच्या १८९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना २ जीबी मोबाइल डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, ३०० एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्ससब्सक्रिप्शन मिळते. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. दरवाढीआधी या प्लानची किंमत १५५ रुपये होती. मात्र, आता या प्लानच्या किंमतीत २२ टक्क्यांनी वाढ करण्यात आली.

जिओच्या १७ प्रीपेड प्लानच्या किंमतीत वाढ

रिलायन्स जिओने आपले १७ प्रीपेड प्लानच्या किंमती वाढवल्या आहेत. जिओच्या २०९ रुपयांच्या प्लानची किंमत आता २४९ रुपये झाली असून त्याची वैधता २८ दिवसांची असेल. २३९ रुपयांचा प्लान आता २९९ रुपयांचा झाला असून त्याची वैधता २८ दिवसांची असेल. तर, २९९ रुपयांचा प्लान आता ३४९ रुपयांपर्यंत महाग झाला आहे. ३४९ , ३९९ आणि ४७९ रुपयांच्या प्लानची किंमत आता अनुक्रमे ३९९, ४४९ आणि ५७९ रुपये झाली आहे.

Whats_app_banner