Reliance Jio 198 Prepaid Plan: एअरटेल, व्होडा-आयडिया आणि एअरटेल कंपनीने ३ जुलैपासून आपल्या रिचार्जच्या किंमती वाढवल्या आहेत. यामुळे अनेकजण कमी किंमतीत अनेक गोष्टी मिळतील, अशा प्लानच्या शोधात आहेत. अशा ग्राहकांसाठी जिओने एक भन्नाट प्लान लॉन्च केला आहे, ज्याची किंमत २०० रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यात वापरकर्त्यांना अनलिमिटेड 5G डेटा, फ्री कॉलिंग आणि बऱ्याच गोष्टी मिळत आहे. जिओच्या या प्लानबद्दल जाणून घेऊयात.
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी १९८ रुपयांचा प्लान लॉन्च केला आहे. या प्लानची वैधता १४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना एकूण २८ जीबी डेटा मिळतो. ग्राहक दररोज २ जीबी डेटा खर्च करू शकतात. दोन आठवड्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि १०० एसएमएसचा लाभ मिळतो. परंतु, दीर्घ वैधता असलेल्या प्लानच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी हा प्लान चुकीचा ठरू शकतो.
रिलायन्स जिओने यापूर्वी नवीन नेटफ्लिक्स बेसिक सब्सक्रिप्शन प्लान लॉन्च केला असून त्याची किंमत १ हजार ७९९ रुपये ठेवण्यात आली. या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची असून दररोज ३ जीबी डेटा मिळतो. सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगव्यतिरिक्त दररोज १०० एसएमएस पाठवण्याचा ही पर्याय आहे. प्लानसोबत नेटफ्लिक्स बेसिक सब्सक्रिप्शनव्यतिरिक्त जिओ अॅप्सचा (जिओ टीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊड) अॅक्सेस दिला जात आहे.
भारती एअरटेलदेखील जिओ प्लॅनसारखेच फायदे देत आहे आणि नेटफ्लिक्स बेसिक सब्सक्रिप्शन मिळते. या प्लॅनमध्ये ८४ दिवसांची वैधता आणि दररोज ३ जीबी डेटा मिळतो. यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. अतिरिक्त लाभ म्हणून यासोबत एअरटेल एक्सट्रीम अॅप्सचा अॅक्सेस दिला जात आहे. याशिवाय अपोलो २४/७ सर्कल, फ्री हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिक अॅक्सेस मिळतो.
दोन्ही प्लॅनसोबत पात्र ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटाचा लाभ दिला जात आहे. जर तुम्हाला नेटफ्लिक्स मोबाइल अॅक्सेस करायचा असेल तर जिओ दररोज २ जीबी डेटासह १ हजार २९९ रुपयांचा प्लान देखील देत आहे. जर तुम्हाला फक्त मोबाईल किंवा टॅब्लेटच्या स्क्रीनवर नेटफ्लिक्स पाहायचे असेल तर हा प्लॅन चांगला आहे.