Reliance Jio down Updates: रिलायन्स जिओच्या वापरकर्त्यांना आज नेटवर्कच्या समस्येला सामोरे जावे लागले. नेटवर्कमध्ये त्रुटी जाणवत असल्याने १० हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या. जिओची कॉलिंग आणि इंटरनेट सेवा बंद झाल्यानंतर सोशल मीडियावर तक्रारींची लाट उसळली. दरम्यान, अनेकांनी जिओला ट्रोल देखील केले. याच पार्श्वभूमीवर कंपनीकडून याबाबत स्पष्टीकरण देताना सेवा सुरळीत करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच ग्राहकांची गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
आज सकाळी मुंबईसह हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, नाशिक, कोलकाता, पाटणा आणि गुवाहाटी येथील रिलायन्स जिओची सेवा पूर्णपण ठप्प झाली. दरम्यान, नेटवर्कमध्ये त्रुटी जाणवत असल्याच्या १० हजारांहून अधिक तक्रारी वापरकर्त्यांनी केल्या. डाऊन डिटेक्टरच्या दिलेल्या माहितीनुसार, ६८ टक्के लोकांनी मोबाईलमध्ये इंटरनेट चालत नसल्याची तक्रार केली. तर, १४ टक्के लोकांनी जिओ फायबरमध्ये समस्या जाणवत असल्याचे सांगितले.
'आज सकाळी मुंबईतील काही जिओ ग्राहकांना किरकोळ तांत्रिक समस्यांमुळे अखंड सेवांचा लाभ घेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. या समस्याचे निराकरण करण्यात आले आहे. जिओच्या सर्व सेवा सुरळीत झाल्या असून ग्राहकांच्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद वाटतो', असे रिलायन्स जिओच्या एका प्रवक्त्याने म्हटले आहे.
अनिल अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स जोओ देशातील दूरसंचार क्षेत्रात आघाडीवर आहे. भारतात सर्वाधिक लोक रिलायन्स जिओचे नेटवर्क वापरतात. देशात रिलायन्स जिओचे ४८९ दशलक्ष वापरकर्ते आहेत. या यादीत एअरटेल कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. एअरटेलचे २८१ दशलक्ष वापरकर्ते आहेत. त्यानंतर व्होडाफोन आयडिया १२८ दशलक्ष वापरकर्त्यांसह तिसऱ्या क्रमांकवर आहेत.
रिलायन्स कंपनीचे महाराष्ट्रातील नवी मुंबईत आहेत. जिओ कंपनी भारतात 5G , 4G आणि 4G+ सेवा पुरवते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे जनक धीरूभाई अंबानी यांच्या ८३ व्या वाढदिवशी म्हणजे २७ डिसेंबर २०१५ या तारखेला जिओचे उद्घाटन झाले. त्यानंतर ५ सप्टेंबरपासून सामान्य लोकांसाठी ही सेवा सुरू करण्यात आली.
जिओचा हा सर्वात महागडा प्लान आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉल, दररोज ३ जीबी डेटा आणि १०० एसएमएस मिळतात. प्लानमध्ये एकूण ८४ जीबी डेटा मिळतो. तसेच जिओ टीव्ही, जिओसिनेमा (प्रीमियम सब्सक्रिप्शन नाही) आणि जिओक्लाऊड सारख्या जिओ अॅप्सचा अॅक्सेस मिळतो. याशिवाय, या प्लानमध्ये अनलिमिटेड 5G डेटा मिळतो.