Reliance Jio चा जागतिक विक्रम! मुकेश अंबानींच्या कंपनीने China च्या कंपनीला दिला छोबीपछाड
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Reliance Jio चा जागतिक विक्रम! मुकेश अंबानींच्या कंपनीने China च्या कंपनीला दिला छोबीपछाड

Reliance Jio चा जागतिक विक्रम! मुकेश अंबानींच्या कंपनीने China च्या कंपनीला दिला छोबीपछाड

Apr 23, 2024 11:09 PM IST

Reliance Jio : भारतीय टेलिकॉम क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केल्यानंतर आता मुकेश अंबानींची (mukesh Ambani) मालकी असलेल्या जिओ कंपनीने डेटा युजर्सच्या बाबतीत जगातील एक नंबरची कंपनी बनली आहे.

मुकेश अंबानींच्या कंपनीने China च्या कंपनीला दिला छोबीपछाड
मुकेश अंबानींच्या कंपनीने China च्या कंपनीला दिला छोबीपछाड

Reliance Jio Beats China Mobile: रिलायन्स जिओने टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. मात्र यावेळी भारतात नाही, तर जागतिक पातळीवर कंपनीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतीय टेलिकॉम क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केल्यानंतर आता मुकेश अंबानींची (mukesh ambani) मालकी असलेल्या जिओ कंपनीने डेटा युजर्सच्या बाबतीत चीनची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी China Mobile ला छोबीपछाड दिली आहे. 

रिलायन्स जिओ आता डेटा ट्रॅफिक बाबतीत जगातील अव्वल कंपनी बनली आहे. मागील तिमाहीत कंपनीने एकूण डेटा ट्रॅफिक ४०.० एक्साबाइट नोंद केली. या ट्रॅफिकसह जिओने आतापर्यंत जगात एक नबंरवरती राहिलेल्या China Mobile ला मागे टाकत एक नंबरची जागा मिळवली आहे. चायना मोबाइल आता डेटा ट्रॅफिकमध्ये दुसऱ्या नंबरवरती घसरली आहे. चीनच्या कंपनीची डेटा युजर्स त्याच्या नेटवर्कवर मागील तिमाहीत ४० एक्साबाइटहून कमी राहिली.

डेटा ट्रॅफिक बाबत Airtel चौथ्या नंबरवर -

चीनची आणखी एक कंपनी चायना टेलीकॉम डेटा ट्रॅफिकमध्ये तिसऱ्या नंबरवरती आहे. तर भारताची एअरटेल चौथ्या नंबरवर आहे. जगभरातील टेलिकॉम कंपन्यांचे डेटा ट्रॅफिक, डेटा युजर्संवर नजर ठेवणाऱ्या टीएफिशियंट संस्थेने आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. 

५जी सेवा सुरू झाल्यानंतर रिलायन्स जिओच्या डेटा ट्रॅफिकमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत ३५.२ टक्के वृद्धी झाली आहे. याचे कारण जिओचे ट्रू ५ जी नेटवर्क आणि जिओ एअर फायबरचा विस्तार. जिओ नेटवर्क रिलायन्स जिओच्या तिमाही अहवालानुसार जिओ ट्रू ५जी नेटवर्कवर १० कोटी ८० लाख ग्राहक कंपनीशी जोडलेले आहेत. तसेच जिओच्या एकूण डेटा ट्रॅफिकचे जवळपास २८ टक्के भाग आता ५जी नेटवर्कमधून येत आहे. दुसरीकडे जिओ एअर फायबरनेही देशभरात ५,९०० शहरात आपली सेवा सुरु केली आहे.

नुकत्याच जारी करण्यात आलेल्या कंपनीच्या तिमाही अहवालातील आकड्यानुसार जिओ नेटवर्कवर प्रति ग्राहक मासिक डेटा वापर वाढून २८.७ जीबी झाली आहे. जी तीन वर्षापूर्वी केवळ १३.३. जीबी होती. २०१८ मध्ये भारतात एका तिमाहीत एकूण मोबाइल डेटा ट्रॅफिक केवळ ४.५ एक्साबाइट होते.

Whats_app_banner