Reliance Jio: रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने सर्व प्रीपेड आणि पोस्टपेड लहान- मोठ्या प्लानच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. टेलिकॉम कंपनीने १९ प्लानसाठी दरवाढीची घोषणा केली. यात १७ प्रीपेड प्लॅन आहेत आणि दोन पोस्टपेड प्लानचा समावेश आहे. जिओचा सर्वात स्वस्त १५५ रुपयांचा प्लानमध्ये २२ टक्क्यांनी वाढ केली आहे. येत्या ३ जुलैपासून हे नवीन दर लागू होणार आहेत.
जिओचा १५५ रुपयांच्या प्लानसाठी आता १८९ रुपये द्यावे लागेल, त्याची वैधता केवळ २८ दिवसांची असेल. २०९ रुपयांचा प्लान आता २४९ रुपयांना उपलब्ध होईल, याची वैधता २८ दिवसांची असेल. पण या प्लानमध्ये मिळणारे फायदे पूर्वीसारखेच असतील. अमर्यादित 5G डेटा देणारा २३९ रुपयांचा प्लान आता उपलब्ध बंद करण्यात आला आहे. हा प्लान आता रुपयांचा प्लॅन आता २९९ रुपयांना उपलब्ध असेल आणि त्याची वैधता २८ दिवस असेल. अमर्यादित 5G डेटा फक्त २ जीबी/प्रतिदिन आणि त्याहून अधिक प्लानवर उपलब्ध असेल.
रिलायन्स जिओने आपल्या मोबाइल सेवेच्या दरात ३ जुलैपासून वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने जवळपास सर्वच प्लॅनमध्ये मोबाइल सेवेचे दर वाढवले आहेत. तब्बल अडीच वर्षांनंतर जिओने मोबाइल सेवेच्या दरात केलेली ही पहिलीच वाढ आहे. सर्वात कमी रिचार्जची किंमत १९ रुपये करण्यात येत आहे, जी १ जीबी डेटा अॅड-ऑन-पॅकसाठी १५ रुपयांपेक्षा सुमारे २७ टक्केजास्त आहे. ७५ जीबी पोस्टपेड डेटा प्लॅनची किंमत आता ३९९ रुपयांऐवजी ४४९ रुपये इतकी असेल. जिओने ८४ दिवसांची वैधता असलेल्या लोकप्रिय ६६६ रुपयांच्या अनलिमिटेड प्लानची किंमत ७९९ रुपये केली आहे.
नवीन प्लॅनची घोषणा करताना जिओने म्हटले आहे की, जागतिक स्तरावर सर्वात स्वस्त दरात सर्वोत्तम दर्जाची सेवा देण्याचे वचन आम्ही कायम ठेवत आहोत. भारत आता 5G मध्ये जगात आघाडीवर आहे. भारतात कार्यरत असलेल्या एकूण 5G सेलपैकी सुमारे 85 टक्के सेल जिओचे आहेत. भारतातील एकमेव स्टँड-अलोन ट्रू 5G नेटवर्कसह जिओ आपल्या वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय आपल्या अग्रगण्य योजनांवर खऱ्या अर्थाने अमर्यादित डेटासह उत्कृष्ट 5G अनुभव प्रदान करत आहे.
संबंधित बातम्या