जिओच्या ग्राहकांची मज्जाच मज्जा! या तीन रिचार्जवर मिळणार ७०० रुपयांचा फायदा, ऑफर फक्त १० सप्टेंबरपर्यंत-reliance jio announces extra benefits on recharges as part of eighth anniversary offer ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  जिओच्या ग्राहकांची मज्जाच मज्जा! या तीन रिचार्जवर मिळणार ७०० रुपयांचा फायदा, ऑफर फक्त १० सप्टेंबरपर्यंत

जिओच्या ग्राहकांची मज्जाच मज्जा! या तीन रिचार्जवर मिळणार ७०० रुपयांचा फायदा, ऑफर फक्त १० सप्टेंबरपर्यंत

Sep 05, 2024 03:00 PM IST

Reliance Jio anniversary Offer : रिलायन्स जिओ आज आपला ८ वा वर्धापनदिन साजरा करत आहे. या निमित्तानं कंपनीनं ग्राहकांना काही खास ऑफर देऊ केल्या आहेत.

जिओच्या ग्राहकांची मज्जाच मज्जा! या तीन रिचार्जवर मिळणार ७०० रुपयांचा फायदा, ऑफर फक्त १० सप्टेंबरपर्यंत
जिओच्या ग्राहकांची मज्जाच मज्जा! या तीन रिचार्जवर मिळणार ७०० रुपयांचा फायदा, ऑफर फक्त १० सप्टेंबरपर्यंत

Jio anniversary Offer : रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. रिलायन्स जिओनं आपल्या ८व्या वर्धापनदिनानिमित्त जिओ युजर्ससाठी खास ऑफर आणली आहे. निवडक रिचार्ज प्लानवर ही ऑफर मिळणार आहे. या ऑफरनुसार, ग्राहकांना ८९९ आणि ९९९ रुपयांच्या तिमाही व ३५९९ रुपयांच्या वार्षिक प्लानवर ७०० रुपयांचा फायदा होणार आहे. ही ऑफर आजपासून १० सप्टेंबर पर्यंत मिळणार आहे.

रिलायन्स जिओचे सध्या ४९ कोटींहून अधिक ग्राहक आहेत. यात १३ कोटी ५जी युजर्सचा समावेश आहे. ऑफरमध्ये नेमकं काय मिळणार आहे पाहूया...

रिचार्जवर ग्राहकांना मिळतील हे फायदे

> या ऑफरमध्ये १७५ रुपयांच्या १० ओटीटी अ‍ॅप्सच्या सब्सक्रिप्शनसह १० जीबी डेटा पॅक मिळेल. याची वैधता २८ दिवसांची असेल.

> झोमॅटोच्या ग्राहकांना ३ महिन्यांचं गोल्ड सब्सक्रिप्शनही मोफत दिलं जाणार आहे.

> जिओकडून २९९९ रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या खरेदीवर ग्राहकांना ५०० रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट दिला जाणार आहे.

> या ऑफरचा फायदा फक्त ५ सप्टेंबर ते १० सप्टेंबर दरम्यान रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांनाच मिळणार आहे.

पुढील तीन प्लान्सवर आहे ऑफर

८९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

या प्लानची वैधता ९० दिवसांची आहे. प्लानमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस मिळतात. याशिवाय ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा आणि २० जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. या प्लॅनचे ग्राहक अनलिमिटेड ५जी डेटासाठी पात्र आहेत. अतिरिक्त फायदा म्हणून प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अ‍ॅक्सेस देखील मिळतो.

९९९ रुपयांचा प्रीपेड प्लान

हा प्लान ९८ दिवसांचा आहे. प्लानमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस मिळतात. याशिवाय दररोज २ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनचे ग्राहक अनलिमिटेड ५जी डेटासाठी पात्र आहेत. अतिरिक्त फायदा म्हणून प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अ‍ॅक्सेस देखील मिळतो.

३५९९ रुपयांचा प्रीपेड प्लान

हा प्लान ३६५ दिवसांसाठी आहे. प्लानमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस मिळतात. याशिवाय ग्राहकांना दररोज २.५ जीबी डेटा मिळतो. या प्लानचे ग्राहक अनलिमिटेड ५जी डेटासाठी पात्र आहेत. अतिरिक्त फायदा म्हणून प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अ‍ॅक्सेस देखील मिळतो.

विभाग