Reliance Jio announces 'Diwali Dhamaka' offer : रिलायन्स जिओने जिओ एयर फायबरसाठी या वर्षीच्या 'दिवाळी धमाका विशेष ऑफरची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे रिलायन्स जिओच्या नव्या आणि आसध्या असणाऱ्या ग्राहकांना एक वर्षाच्या मोफत सदस्यत्वाचा आनंद घेता येणार आहे. या दिवाळी विशेष ऑफरमध्ये रिलायन्स डिजिटल स्टोअर्समधून खरेदी करणे किंवा विशेष रिचार्ज प्लॅन ग्राहकांना निवडता येणार आहे.
रिलायन्स जिओ एयर फायबरचे नवे ग्राहक आता एक वर्षाच्या मोफत सबस्क्रिप्शन प्लॅनचा लाभ घेऊ शकणार आहेत. या सोबतच रिलायन्स डिजिटलवर खरेदी देखील करता येणार आहे. ग्राहकांना स्मार्टफोन, गृहोपयोगी उपकरणे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या उत्पादनांवर रिलायन्स डिजिटल किंवा माय जिओ स्टोअरमध्ये २० हजाराहून किंवा त्या पेक्षा अधिक रक्कमेची खरेदी करता येणार आहे.
विशेष दिवाळी योजना: तीन महिन्यांच्या दिवाळी प्लॅनसह नवीन एअरफायबर कनेक्शन ग्राहकांना निवडता येणार आहे. ज्याची किंमईत ही २,२२२ रुपये आहे.
तर सध्या असणाऱ्या जिओ एयर फायबर ग्राहकांसाठी सुद्धा २२२२ रुपयांच्या विशेष तीन महिन्यांच्या दिवाळी प्लॅनसह रिचार्ज करून मोफत वर्ष भरायच्या प्लॅनचा आनंद रिलायन्सच्या ग्राहकांना घेता येणार आहे.
यशस्वी रिचार्ज किंवा नवीन कनेक्शनवर, ग्राहकांना त्यांच्या सध्याच्या चालू एअरफायबर योजनेच्या मूल्याच्या समतुल्य दर महिन्याला १२ कूपन मिळतील. नोव्हेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान वैध असलेली ही कूपनं ३० दिवसांच्या आत रिलायन्स डिजिटल, माय जिओ, जिओपॉइंट किंवा JioMart डिजिटल विशेष स्टोअरमध्ये १५००० रु. पेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक्स खरेदीसाठी रिडीम करता येणार आहे.
रिलायन्स जिओने अलीकडेच झोमॅटो गोल्ड मेंबरशिप, ओटीटी सबस्क्रिप्शन आणि ई-कॉमर्स व्हाउचर यांचा समावेश असलेल्या विशेष रिचार्ज प्लॅनसह आठव्या वर्धापन दिनाच्या समारंभाची सांगता केली. ८ सप्टेंबरपर्यंत वैध असलेल्या या ऑफर ८९९ रुपयांच्या तिमाही रिचार्ज प्लॅनवर लागू होत्या. या सोबतच ८९९ आणि ९९९ रुपयांच्या भारतातील व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेच्या अतुलनीय कव्हरेजसाठी बिझनेस टुडे मासिकाची सदस्यता देखील उपलब्ध करून देण्यात आली होती.