Jio vs Airtel 5G mobile data plans compared: भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओने आपल्या 5G प्लानच्या किंमती वाढवल्यानंतर एअरटेलने देखील आपल्या विविध प्लानच्या नव्या किंमतीत दरवाढ केली आहे. ही दरवाढ येत्या ३ जुलैपासून लागू होईल. या दरवाढीचा एअरटेलच्या लाखो वापरकर्त्यांना फटका बसणार आहे.न वाढणार: एअरटेल
एअरटेलने आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेट अशा दोन्ही 5G प्लानच्या किंमतींमध्ये बदल केला आहे. प्रीपेड अनलिमिटेड व्हॉईस प्लानची किंमत १७९ रुपयांऐवजी १९९ रुपये केली आहे. तर, ४५५ रुपयांच्या प्लानची किंमत ५०९ रुपये आणि १ हजार ७९९ रुपयांच्या प्लानची किंमत १ हजार ९९९ रुपये करण्यात आली.
२६५ रुपयांचा प्लान आता २९९ रुपये, २९९ रुपयांचा प्लान ३४९ रुपये, ३५९ रुपयांचा प्लान ४०९ रुपये, ३९९ रुपयांचा प्लान ४४९ रुपये, ४७९ रुपयांचा प्लान ५७९ रुपये, ५४९ रुपयांचा प्लान ६४९ रुपये, ७१९ रुपयांचा प्लान ८५९ रुपयांचा आहे. ८३९ रुपयांचा प्लान ९७९ रुपये आणि २ हजार ९९९ रुपयांचा प्लानसाठी आता ३ हजार ५९९ रुपये द्यावे लागणार आहे.
याव्यतिरिक्त, डेटा अॅड-ऑनमध्ये सुधारणा करण्यात आली, १९ रुपयांच्या प्लानची किंमत आता २२ रुपये, २९ रुपयांच्या प्लानची किंमत ३३ रुपये आणि ६५ रुपयांच्या प्लानची किंमत ७७ रुपये आहे. पोस्टपेड सेगमेंटमध्ये मासिक टॅरिफ प्लॅनमध्येही अॅडजस्टमेंट पाहायला मिळाले. ३९९ रुपयांचा प्लॅन आता ४४९ रुपये, ४९९९ रुपयांचा प्लान ५४९ रुपये, ५९९ रुपयांचा प्लान ६९९ रुपये आणि ९९९ रुपयांचा प्लान १ हजार १९९ रुपये आहे.
जिओने देखील आपल्या प्लानच्या किंमती सुमारे २० टक्क्यांनी वाढवल्या आहेत. जिओच्या २ जीबी डेटासह अनलिमिटेड व्हॉईस आणि एसएमएस प्लानची किंमत १५५ रुपयांवरून १८९ रुपये करण्यात आली. अनलिमिटेड व्हॉईस, एसएमएस आणि दररोज १ जीबी 5G डेटा देणाऱ्या प्लानची किंमत पूर्वी २८ दिवसांसाठी २०९ रुपये होती, ती आता २४९ रुपये झाली. वार्षिक जिओ अनलिमिटेड प्लानपूर्वी २ हजार ९९९ रुपये होता, आता त्यासाठी ३ हजार ५९९ रुपये मोजावे लागणार आहेत.
अनलिमिटेड व्हॉईस, एसएमएस आणि दररोज २ जीबी ५जी डेटा देणारा प्लान पूर्वी २९९ रुपये होता, तो आता २८ दिवसांसाठी ३४९ रुपये झाला आहे. ५३३ रुपयांच्या प्लानची ची किंमत आता ६२९ रुपये झाली आहे. पोस्टपेड प्लॅनमध्येही वाढ झाली असून, ३० जीबी डेटा प्लॅन आता २९९ रुपयांऐवजी ३४९ रुपयांपासून सुरू होणार आहे. याशिवाय, १ जीबी डेटा असलेला बेस प्लान १५ रुपयांवरून १९ रुपये करण्यात आला.
एअरटेल आणि जिओची तुलना करताना एअरटेलचे प्रीपेड प्लान आता १९९ रुपयांपासून ३ हजार ५९९ रुपयांपर्यंत आहेत. तर, जिओचे प्लान १८९ रुपयांपासून ३ हजार ५९९ रुपयांपर्यंतआहेत. पोस्टपेड प्लॅनचा विचार केला तर, एअरटेलची किंमत ४४९ रुपयांपासून १ हजार ११९ रुपयांपर्यंत आहे. तर, जिओची किंमत ३४९ रुपयांपासून ४४९ रुपयांपर्यंत आहे. याव्यतिरिक्त, डेटा अॅड-ऑनसाठी एअरटेलची किंमत आता २२ रुपयांपासून ७७ रुपयांपर्यंत आहे. तर जिओची किंमत १९ रुपयांपासून ६९ रुपयांपर्यंत आहे.
संबंधित बातम्या