Jio Recharge: जिओचा स्वस्त पोस्टपेड प्लान, १०० जीबी डेटा, नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमा एकदम फ्री!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Jio Recharge: जिओचा स्वस्त पोस्टपेड प्लान, १०० जीबी डेटा, नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमा एकदम फ्री!

Jio Recharge: जिओचा स्वस्त पोस्टपेड प्लान, १०० जीबी डेटा, नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमा एकदम फ्री!

Nov 24, 2024 11:34 PM IST

जिओ प्लस पोस्टपेड प्लानमध्ये ग्राहकांना १०० जीबी डेटा, नेटफ्लिक्स आणि जोओ सिनेमा एकदम फ्री मिळत आहे.

: जिओचा स्वस्त पोस्टपेड प्लान, १०० जीबी डेटा, नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमा एकदम फ्री!
: जिओचा स्वस्त पोस्टपेड प्लान, १०० जीबी डेटा, नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमा एकदम फ्री! (REUTERS)

Reliance Jio: जिओ आपल्या युजर्सला जबरदस्त प्लॅन ऑफर करत आहे. कंपनीकडे प्रीपेड प्लानची लांबलचक यादी आहे. दुसरीकडे जर तुम्ही पोस्टपेड प्लानच्या शोधात असाल तर जिओ प्लस प्लान तुमच्यासाठी बेस्ट आहेत. येथे आम्ही तुम्हाला परवडणाऱ्या जिओ प्लस पोस्टपेड प्लॅन्सबद्दल सांगत आहोत. या प्लान मध्ये इंटरनेट वापरण्यासाठी १०० जीबीपर्यंत डेटा मिळणार आहे. याशिवाय, कंपनी या प्लानमध्ये जिओ सिनेमाचा फ्री अॅक्सेस देखील देत आहे. ज्या प्लॅन्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्यात एक प्लॅन असाही आहे जो नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओच्या फ्री अॅक्सेससह येतो. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री एसएमएसही मिळतील. चला तर मग जाणून घेऊया जिओच्या या प्लॅन्सबद्दल.

जिओ प्लसचा ३४९ रुपयांचा प्लान:

कंपनीच्या या प्लानमध्ये ३० जीबी डेटा मिळतो. डेटा लिमिट संपल्यानंतर तुम्हाला १० रुपये प्रति जीबी डेटा खर्च करावा लागेल. विशेष म्हणजे,  या प्लानमध्ये पात्र युजर्संना अनलिमिटेड 5जी डेटाही मिळणार आहे. प्लानमध्ये कंपनी देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० फ्री एसएमएस देत आहे. प्लानमध्ये तुम्हाला जिओ टीव्हीसोबत जिओ सिनेमाचा फ्री अ‍ॅक्सेस देखील मिळेल.

जिओ प्लसचा ४४९ रुपयांचा प्लान:

जिओच्या या फॅमिली पोस्टपेड प्लानमध्ये ३ अ‍ॅड-ऑन सिम मिळतात. प्लानमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला एकूण ७५ जीबी डेटा मिळेल. फॅमिली सिममध्ये कंपनी दरमहिन्याला ५ जीबी अतिरिक्त डेटा ही देत आहे. कंपनी या प्लानमध्ये पात्र युजर्संना अनलिमिटेड 5जी डेटा देखील देत आहे. रोज १०० फ्री एसएमएस देणाऱ्या या प्लानमध्ये तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा फ्री अ‍ॅक्सेस मिळतो.

जिओचा हा परवडणारा प्लान अशा युजर्ससाठी बेस्ट आहे ज्यांना कमी किंमतीत भरपूर डेटा आणि प्रीमियम ओटीटी बेनिफिट्स हवे आहेत. या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी कंपनी १०० जीबी डेटा देत आहे. हा एक कौटुंबिक प्लॅन असून कंपनी तीन अ‍ॅड-ऑन सिम पर्याय देत आहे. अतिरिक्त सिममध्ये दरमहा ५ जीबी अतिरिक्त डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स (बेसिक), अ‍ॅमेझॉन प्राईम लाइट, जिओ सिनेमा आणि जिओ टीव्हीचा फ्री अ‍ॅक्सेस मिळतो. प्लानमध्ये दिले जाणारे अ‍ॅमेझॉन प्राईम लाइट सब्सक्रिप्शन २ वर्षांसाठी वैध आहे. लक्षात ठेवा या सर्व प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ सिनेमाचे प्रीमियम सब्सक्रिप्शन मिळणार नाही.

Whats_app_banner