Reliance Jio Prepaid Plans: पॉप्युलर ओटीटी सर्व्हिसेसचे सब्सक्रिप्शन मोफत हवे असेल तर वेगळे पैसे देण्याची गरज नाही. रिलायन्स जिओकडून असे अनेक प्लान ऑफर केले जात आहेत, ज्यातून रिचार्ज झाल्यास ओटीटी सेवांचे कॉम्प्लिमेंटरी सब्सक्रिप्शन दिले जात आहे. जिओच्या ८४ दिवसांच्या रिचार्जमध्ये सोनी लिव्ह आणि झी५ चे सब्सक्रिप्शन मोफत मिळत आहे.
रिलायन्स जिओच्या १ हजार ४९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना सोनीलिव्ह आणि झी५ कॉम्बो सब्सक्रिप्शन प्लान मिळतो. या प्लान मध्ये डेली डेटा बेनिफिटव्यतिरिक्त पात्र ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटाचा फायदा दिला जातो. म्हणजेच जर तुमच्याकडे 5जी स्मार्टफोन असेल आणि जिओची 5G सेवा तुमच्या भागात उपलब्ध असेल तर तुमच्यासाठी डेली डेटा लिमिट लागू होणार नाही.
जिओ वापरकर्त्यांना या प्लानसह रिचार्ज केल्यास ८४ दिवसांच्या वैधतेसह दररोज 2 जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, ते सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देखील करू शकतात. या प्लानने रिचार्ज केल्यास दररोज १०० एसएमएस पाठवण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. तसेच या प्लानमध्ये जिओ अॅप्सचा ही अॅक्सेस मिळतो.
जिओटीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊड अॅप्स व्यतिरिक्त, १०४९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना समान वैधतेसाठी सोनीलिव्ह आणि झी५ या दोन्हींचा अॅक्सेस मिळतो. जिओटीव्ही मोबाइल अॅपच्या माध्यमातून युजर्सना या दोन्ही सेवांचा कंटेंट पाहण्याचा पर्याय देण्यात येत आहे.
तसेच जर तुम्हाला २८ दिवसांची वैधता हवी असेल तर जिओ युजर्स ४४५ आणि १७५ रुपयांच्या जिओटीव्ही प्रीमियम प्लानसह रिचार्ज करू शकतात. या प्लानमध्ये एकाच वेळी अनेक ओटीटी सर्व्हिसेसमधून कंटेंट पाहण्याचा पर्याय देण्यात आला आहे. यापैकी सर्वात स्वस्त प्लान अॅक्टिव्ह प्लानसह डेटा-ओनली व्हाउचर म्हणूनही निवडला जाऊ शकतो.
जिओचा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लान ३४९ रुपयांचा आहे. हा प्लान फक्त एका युजरसाठी आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना ३० जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. प्लानसोबत अनलिमिटेड ५जी डेटाही मिळतो. प्लानमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाले तर यात जिओ टीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊडचे सब्सक्रिप्शन देखील मिळते. जिओच्या अशाच प्लानबाबत जाणून घेण्यासाठी ग्राहक जिओच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकतात.
संबंधित बातम्या