Reliance Jio 5 G : राज्यातील या सात शहरांमध्ये जिओ ५ जी सुरु, दुप्पट स्पीड, जबरदस्त नेटवर्क
Reliance Jio 5 G : गुडन्यूज ! महाराष्ट्रातील सात शहरांमध्ये आजपासून जिओ ५ जी नेटवर्क संपूर्णपणे कार्यन्वित करण्यात आले आहे.
Reliance Jio 5 G : गुडन्यूज ! महाराष्ट्रातील सत शहरांमध्ये आजपासून जिओ ५ जी नेटवर्क संपूर्णपणे कार्यन्वित करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर या शहरांचा समावेश आहे.याशिवाय देशातील २२ राज्यातील अंदाजे १०२ शहरांमध्येही आजपासून जिओ सुरु झाले आहे.
ट्रेंडिंग न्यूज
जिओ ५ जी चा वापर कसा करावा
५ जी नेटवर्क सुरु करण्यासाठी जिओ आघाडीवर असताना, कंपनीने अद्याप व्यावसायिक पातळीवर जिओची सुरुवात केलेली नाही. याचा अर्थ जिओ ५ जी सेवा पूर्ण सक्षमतेने सर्व यूजर्ससाठी कार्यन्वित झालेली नाही. त्याऐवजी, या शहरांमधील जिओ वापरकर्त्यांना जिओ 5 जी साठी आमंत्रण मिळेल. यात जिओ स्वागत ऑफर, कनेक्ट करण्यासाठी आणि १ जीबीपीएसपर्यंत अमर्यादित डेटाचा अनुभव घेण्यासाठी, कोणत्याही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
संबंधित बातम्या
विभाग