Reliance Jio vs Airtel and VI: भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी रिलायन्स नेहमीच त्यांच्या ग्राहकांसाठी खास प्लान आणत असते. जिओला देशातील सर्वात स्वस्त आणि परवडणारे रिचार्ज प्लॉन लॉन्च करणारी कंपनी म्हणून ओळखले जाते.अशा प्लॉनमुळेच जिओने बाजारातील स्पर्धक कंपन्यांना टाळे लावण्याची वेळ आणली. दरम्यान, जिओने त्यांच्या ग्राहकांना २०९ रुपयांचा रिचार्ज प्लान आणला आहे, ज्यात ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, २८ जीबी डेटा आणि फ्री एसएमएससह बऱ्याच गोष्टी मिळत आहेत. जिओचा हा प्लान इतर कंपनीच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे.
जिओच्या २०९ रुपयांच्या रिचार्जमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वॅलिडिटी मिळते, ज्यात दररोज १ जीबी डेटा मिळतो. याशिवाय, अनलिमिटेड वॉइस कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस मिळतात. एवढेच नव्हेतर, या प्लानमध्ये ग्राहकांना फुकटात जिओ अॅपचे सब्सक्रिप्शन देखील मिळते.
एअरटेलच्या २०९ रुपयांच्या रिचार्जमध्ये ग्राहकांना दररोज १ जीबी डेटासह १०० एसएमएस मिळतात. याशिवाय, ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग मिळते. याचबरोबर, ग्राहकांना हॅलो ट्यून आणि फ्री विंक म्यूजिक सब्सक्रिप्शन मिळते. मात्र, या प्लॉनमध्ये ग्राहकांना २१ दिवसांची वॅलिडिटी मिळत आहे. म्हणजेच जिओच्या तुलनेत या प्लॉनची वॅलिडिटी ७ दिवसांपेक्षा कमी आहे.
व्होडाफोन- आयडियाच्या प्रीपेड प्लानमध्ये ग्राहकांना ४ जीबी हाय स्पीड डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि कोणत्याही नेटवर्कवर दररोज १०० एसएमएस मिळतात. या प्लॉनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वॅलिडिटी मिळते. परंतु, ग्राहकांना संपूर्ण महिनाभरासाठी फक्त ४ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये ग्राहकांना मोफत Vi Movies आणि TV सब्सक्रिप्शन मिळते.