Reliance Share price : रिलायन्सचा शेअर थांबायचं नावच घेईना! आता घेतला तर फायदा होईल का? एक्सपर्ट म्हणतात…
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Reliance Share price : रिलायन्सचा शेअर थांबायचं नावच घेईना! आता घेतला तर फायदा होईल का? एक्सपर्ट म्हणतात…

Reliance Share price : रिलायन्सचा शेअर थांबायचं नावच घेईना! आता घेतला तर फायदा होईल का? एक्सपर्ट म्हणतात…

Jun 28, 2024 01:46 PM IST

Reliance Industries Share price : बाजार भांडवलाच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर सध्या जबरदस्त तेजीत आहे. या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी काय करावं याचा सल्ला मार्केट एक्सपर्ट्सनी दिला आहे.

रिलायन्सचा शेअर थांबायचं नावच घेईना! आता घेतला तर फायदा होईल का? वाचा
रिलायन्सचा शेअर थांबायचं नावच घेईना! आता घेतला तर फायदा होईल का? वाचा

Reliance Industries Share price : तुमच्या पोर्टफोलिओमध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स नसतील तर लगेच खरेदी करा. कारण, येत्या काळात या शेअरचा भाव ३.५८० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो?

हा अंदाज गुंतवणूक क्षेत्रातील नामांकित कंपनी ‘जेफरीज ग्रुप’नं वर्तवला आहे. निफ्टी 50 आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे समभाग आज २ टक्क्यांनी वधारले आहेत. शेअरमधील या तेजीमुळं रिलायन्स इंडस्ट्रीजचं मार्केट कॅप आज प्रथमच २१ लाख कोटी रुपयांच्या पुढं गेलं आहे. आज या शेअरनं ३१२९ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली.

२८ मार्केट एक्सपर्ट म्हणतात, खरेदी करा!

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरवर नजर ठेवून असलेल्या एकूण ३५ विश्लेषकांपैकी २८ विश्लेषकांनी खरेदीचा सल्ला दिला आहे. तर, पाच जणांनी 'होल्ड' करण्याचा सल्ला दिला आहे, तर दोन विश्लेषकांनी विकण्याचा सल्ला दिला आहे.

लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, जागतिक ब्रोकरेज हाऊस जेफरीजनं रिलायन्सवरील आपली टार्गेट प्राइस वाढवली आहे. याआधी जेफरीजनं हा शेअर ३,३८० रुपयांपर्यंत जाईल असं म्हटलं होतं. मात्र, आता तो ३,५८० रुपयांवर जाईल असं म्हटलं आहे. म्हणजेच येत्या काळात रिलायन्सच्या शेअरमध्ये सुमारे १७ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.

एका वर्षात २३ टक्के परतावा

रिलायन्सचा शेअर मागील वर्षभरापासून तेजीत आहे. या कालावधीत कंपनीनं गुंतवणूकदारांना २३ टक्के परतावा दिला आहे. तर, यंदाच्या जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत २० टक्के परतावा दिला आहे. ही वाढ आणखी काही दिवस अशीच राहण्याची अपेक्षा आहे.

जेफरीज काय म्हणते?

जेफरीजनं रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरवर BUY ही शिफारस कायम ठेवली आहे. आर्थिक वर्ष २०२४ ते २०२७ या कालावधीत जिओच्या महसुलात १८ टक्के आणि करोत्तर नफ्यात (पीएटी) २६ टक्के (सीएजीआर) वाढ होण्याची शक्यता आहे.

मॉर्गन स्टॅनलीनं रिलायन्सवर 'ओव्हरवेट' रेटिंग कायम ठेवलं आहे. या शेअरची टार्गेट प्राइस ३०४६ रुपये आहे. मॉर्गन स्टॅनलीला आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत दरांमध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा नाही, परंतु त्या पुढच्या वर्षी सुमारे २०% दरवाढ केल्यास उत्पन्नात १० ते १५% वाढ होऊ शकते.

 

(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ माहितीपर आहे. यातील तज्ज्ञांच्या शिफारशी, सूचना, मते ही त्यांची स्वतःची आहेत, हिंदुस्थान मराठीची नाहीत. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यात जोखीम असते. गुंतवणूक करण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्या.)

Whats_app_banner