stock market update : सव्वा महिन्यात पैसे दुप्पट; रिलायन्स ग्रुपच्या या कंपनीच्या नफ्यात तब्बल ४७०० टक्के वाढ
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  stock market update : सव्वा महिन्यात पैसे दुप्पट; रिलायन्स ग्रुपच्या या कंपनीच्या नफ्यात तब्बल ४७०० टक्के वाढ

stock market update : सव्वा महिन्यात पैसे दुप्पट; रिलायन्स ग्रुपच्या या कंपनीच्या नफ्यात तब्बल ४७०० टक्के वाढ

Jul 29, 2024 08:12 PM IST

Stock Market Update : रिलायन्स समूहातील एक छोटी कंपनी असलेल्या लोटस चॉकलेटच्या शेअरनं गुंतवणूकदारांना मालामाल करून टाकलं आहे.

stock market update : सव्वा महिन्यात पैसे दुप्पट; रिलायन्स ग्रुपच्या या कंपनीच्या नफ्यात तब्बल ४७०० टक्के वाढ
stock market update : सव्वा महिन्यात पैसे दुप्पट; रिलायन्स ग्रुपच्या या कंपनीच्या नफ्यात तब्बल ४७०० टक्के वाढ

Lotus Chocolate share price : गेल्या काही काळापासून शेअर बाजारात उसळलेल्या तेजीचा छोट्या कंपन्यांनाही मोठा फायदा होत आहे. लोटस चॉकलेट कंपनी हे त्याचं ताजं उदाहरण आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. लोटस चॉकलेटचा शेअर सोमवारी ५ टक्क्यांनी वधारून १०३५.०५ रुपयांवर पोहोचला.

लोटस चॉकलेट कंपनीचे समभाग सलग आठव्या दिवशी वरच्या सर्किटवर आहेत. या शेअरनं आज (सोमवार) ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. जून २०२४ च्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात ४७०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २१३ रुपये आहे.

लोटस चॉकलेट कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या ९ ट्रेडिंग सेशनमध्ये ५२ टक्क्यांची वाढ झाली आहे. १५ जुलै २०२४ रोजी कंपनीचा शेअर ६८१.५० रुपयांवर होता, तो आज १०३५.०५ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ५ आठवड्यात लोटस चॉकलेट कंपनीच्या शेअर्समधील गुंतवणूकदारांचे पैसे दुपटीनं वाढले आहेत. या काळात कंपनीचे समभाग १२० टक्क्यांनी वधारले आहेत. लोटस चॉकलेटचा शेअर २४ जून २०२४ रोजी ४७० रुपयांवर होता, तो आज १०३५.०५ रुपयांवर पोहोचला आहे.

नफ्याचे आकडे कसे बदलले?

लोटस चॉकलेट कंपनीचा नफा वार्षिक आधारावर ४७००.८७ टक्क्यांनी वाढला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लोटस चॉकलेटचा नफा ९.४१ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा नफा अवघा ०,२० कोटी रुपये होता. तर, मार्च २०२४ तिमाहीत कंपनीचा नफा १.१८ कोटी रुपये होता. कंपनीचं उत्पन्न ४ पटीनं वाढून १४१.३ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. मागील वर्षी याच कालावधीत हे उत्पन्न ३२.३ कोटी रुपये होतं.

ही कंपनी रिलायन्स समूहाचा भाग

लोटस चॉकलेट कंपनी ही चॉकलेट, कोको उत्पादने आणि तत्सम इतर उत्पादनांची निर्मिती करते. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVAL) च्या मालकीची उपकंपनी असलेल्या रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडनं (RCPAL) २४ मे २०२३ रोजी लोटस चॉकलेट कंपनीतील नियंत्रक हिस्सा खरेदी केला. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVAL) ही मुकेश अंबानी यांच्या मालकीची असून ती रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीच्या सर्व किरकोळ कंपन्यांची होल्डिंग कंपनी म्हणून ही कंपनी काम करते.

Whats_app_banner