RIL share price : रिलायन्स इंडस्ट्रीज देणार प्रत्येक शेअरवर बोनस, आता गुंतवणूक करावी का? एक्सपर्ट्स म्हणतात…
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  RIL share price : रिलायन्स इंडस्ट्रीज देणार प्रत्येक शेअरवर बोनस, आता गुंतवणूक करावी का? एक्सपर्ट्स म्हणतात…

RIL share price : रिलायन्स इंडस्ट्रीज देणार प्रत्येक शेअरवर बोनस, आता गुंतवणूक करावी का? एक्सपर्ट्स म्हणतात…

Published Sep 02, 2024 10:09 AM IST

Reliance Industries share price : रिलायन्स इंडस्ट्रीजनं पुन्हा एकदा बोनस शेअरची घोषणा केली आहे. कंपनीच्या या घोषणेमुळं या शेअरच्या कामगिरीवर मार्केट एक्सपर्ट्स आशावादी आहेत.

RIL share price : रिलायन्स इंडस्ट्रीज देणार प्रत्येक शेअरवर बोनस, खरेदी करायचा का? एक्सपर्ट्स म्हणतात…
RIL share price : रिलायन्स इंडस्ट्रीज देणार प्रत्येक शेअरवर बोनस, खरेदी करायचा का? एक्सपर्ट्स म्हणतात…

Stock market news updates : रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार प्रत्येक शेअर एक शेअर मोफत दिला जाणार आहे. त्याचा नेमका काय परिणम होऊ शकतो? रिलायन्सच्या शेअरचा भाव किती वाढू शकतो? यावर तज्ज्ञांनी मतं मांडली आहेत.

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, ब्रोकरेज फर्म 'मोतीलाल ओसवाल'नं रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर ३४३५ रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असं मोतीलालनं म्हटलं आहे. 

मास्टर कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेडशी संबंधित विष्णुकांत उपाध्याय यांच्या मतानुसार, 'रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बोनस शेअरच्या घोषणेनंतर आता नवीन गुंतवणूकदार हा शेअर खरेदी करू शकतात. त्यामुळं नजिकच्या काळात हा शेअर १५ ते २० टक्क्यांनी वाढू शकतो. गुंतवणूकदारांनी आपले पैसे मध्यम किंंवा दीर्घ मुदतीचा दृष्टीकोन ठेवूनच गुंतवावेत. स्टॉपलॉस २९०० रुपयांवर ठेवावा. आठवड्याच्या पहिल्या दिवशी, आज शेअरच्या किंमतीत वाढ दिसत आहे.

कंपनीचे तिमाही निकाल कसे आहेत?

जून तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे उत्पन्न २,३५,७६७ कोटी रुपये आहे. वार्षिक आधारावर हा आकडा ११.५४ टक्के अधिक आहे. परंतु मार्च तिमाहीच्या तुलनेत हे प्रमाण २.२० टक्क्यांनी कमी आहे. एप्रिल ते जून या कालावधीत कंपनीचा करोत्तर नफा १७,४४८ कोटी रुपये झाला आहे.

जून तिमाहीपर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये एकूण प्रवर्तकांचा हिस्सा ५०.३३ टक्के आहे. या कंपनीत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा हिस्सा २१.५ टक्के आहे. तर, डीआयआयकडे १७.२५ टक्के हिस्सा आहे.

आतापर्यंत किती वेळा दिलाय बोनस?

रिलायन्स इंडस्ट्रीजनं गेल्या ४ दशकांत गुंतवणूकदारांना ५ वेळा बोनस शेअर दिले आहेत. कंपनीनं शेवटचा बोनस शेअर २०१७ मध्ये दिला होता. तेव्हा कंपनीनं एका शेअरवर १ शेअरचा बोनस दिला. १९८० मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजनं पहिल्यांदा बोनस शेअर दिला होता. त्यानंतर १९८३, १९९७ आणि २००९ मध्ये बोनस शेअर्स देण्यात आले आहेत. गेल्या १० वर्षांत कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना १६ वेळा लाभांशही दिला आहे.

 

(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)

Whats_app_banner