Skill Development : रिलायन्स फाउंडेशन देणार ५ लाख तरुणांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Skill Development : रिलायन्स फाउंडेशन देणार ५ लाख तरुणांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण

Skill Development : रिलायन्स फाउंडेशन देणार ५ लाख तरुणांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण

HT Marathi Desk HT Marathi
Published Feb 16, 2024 01:04 PM IST

रिलायन्स फाउंडेशनतर्फे केंद्र सरकारच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून देशभरातील ५ लाख तरुणांना भविष्योपयोगी सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, अॅडटेक सारखे कौशल्य अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

रिलायन्स फाउंडेशन देणार ५ लाख तरुणांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण
रिलायन्स फाउंडेशन देणार ५ लाख तरुणांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण

रिलायन्स फाउंडेशनतर्फे केंद्र सरकारच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (National Skill Development Corporation) च्या माध्यमातून देशभरातील ५ लाख तरुणांना भविष्योपयोगी कौशल्य अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात सायबर सुरक्षा (Cyber Security), कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), शाश्वत पर्यावरण, धोरण विश्लेषण, अॅडटेक (Advertising Technolog) यासारख्या विषयांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. केंद्रीय कौशल्य आणि उद्योजकता विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतीच याची घोषणा केली. याबद्दल बोलताना प्रधान म्हणाले,'तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिल्याने भविष्यात भारत कौशल्य विकास क्षेत्रात घोडदौड करणार आहे. कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणाद्वारे भारतीय तरुण जगात कुठेही आपली चमक दाखवू शकणार आहे. कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून भारत आता लवकरच विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे' असं प्रधान म्हणाले. 

भारतात जगातली सर्वात मोठी तरुणांची लोकसंख्या असून या तरुणांना भविष्योपयोगी कौशल्य शिकवण्याचा प्रयत्न असल्याचे रिलायन्स फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ कुमार यांनी सांगितले. अशा प्रशिक्षणाद्वारे कुशल तंत्रज्ञांची देशांतर्गतच नव्हे तर जागतिक गरज पूर्ण होईल. भारतीय तरुण जागतिक स्पर्धेत टिकाव धरू शकतील आणि त्यांना करिअरच्या विविध वाटा शोधण्यात मदत होईल, असंही कुमार म्हणाले. 

रिलायन्स फौंडेशन आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने एकत्र येऊन तरुणांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी अत्याधुनिक अभ्यासक्रमाची रचना केली आहे. यात चांगली विद्यार्थी सेवा देणे, उत्तम प्रशिक्षक नेमणे, एआय सहाय्यित ऑनलाइन मूल्यांकन करणे आणि प्रशिक्षित तरुणांचे औद्योगिक क्षेत्रात प्लेसमेंट करणे या गोष्टींचा समावेश असणार आहे.

नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही एक नोडल एजन्सी असून केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने जाहीर केलेले ‘स्किल इंडिया मिशन’ योजना राबवण्यासाठी देशभर कार्य करते. भारतात विविध संस्था आणि फौंडेशन्ससोबत भागिदारी करून आतापर्यंत तीन कोटीहून अधिक तरुणांना कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. एनएसडीसीने देशभरात ३७ ‘सेक्टर स्किल कौन्सिल’ची स्थापना केली असून आणि केंद्राच्या ‘प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY), नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम (NAPS) या योजनांची अंमलबजावणी केली आहे.

Whats_app_banner