Reliance-Disney Merger : मुकेश अंबानीयांची रिलायन्स आणि डिज्ने दरम्यान अखेर डील फायनल झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वाल्ट डिज्ने मर्जरवर (Reliance And Disney Joint Venture) शिक्कामोर्तब झाले आहे. वॉल्ट डिज्ने कंपनी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजने बुधवार (२८ फेब्रुवारी) भारतात आपल्या मीडिया संचालनाचे विलिनीकरण करून ७०,००० कोटी रुपयांची एक मोठी कंपनी बनवण्याची घोषणा केली आहे. डिज्ने आणि रिलायन्स या करारारवर हस्ताक्षर करतील.
दोन्ही कंपन्यांनी आपल्या संयुक्त निवेदनात म्हटले की, संयुक्त कंपनीत रिलायन्स व त्याच्या सहायक कंपन्यांचा हिस्सा ६३.१६ टक्के असेल. दुसरीकडे डिज्नेकडे उर्वरित ३६.८४ टक्के भागीदारी असेल. निवेदनानुसार या करारात दोन कंपन्याच्या विलीनीकरणातून बनलेल्या कंपनीत रिलायन्स ११,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल.
रिलायन्सने ओटीटी उद्योग वाढविण्यासाठी जॉइंट व्हेंचरमध्ये जवळपास ११,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासंदर्भात रिलायन्सने म्हटले आहे की, आम्ही भारतात मीडिया आणि मनोरंजन उद्योगाच्या डिजिटल बदलाचे नेतृत्व करू आणि ग्राहकांना कधीही आणि कुठेही हाई क्वालिटी आणि अधिकाधिक कंटेट पुरवू. या नव्या कंपनीला ३०,००० हून अधिक डिस्ने कंटेंट एसेटच्या लायसन्स सोबतच भारतात डिस्ने फिल्म्सचे डिस्ट्रिब्यूशनचा अधिकारही मिळेल.
मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना मोठी जबाबदारी सोपवली गेली आहे. रिलायन्सने सांगितले की, नीता अंबानी ज्वॉइंट व्हेंचरच्या बोर्डाची चेअरपर्सन असतील आणि Disney चे माजी वरिष्ठ कार्यकारी उदय शंकर उपाध्यक्ष असतील. दरम्यान रिलायंस-डिज्नी मर्जरनंतर ज्वॉइंट व्हेंचरमध्ये १२० टीव्ही चॅनल्स आणि २ स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म असतील.
दरम्यान रिलायन्स आणि डिस्ने यांचे मर्जर झाल्याने आता कलर्स, स्टारप्लस, स्टार गोल्ड, स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स १८ सारखे अनेक चॅनेल्स सोबत येतील. तसेच JioCinema आणि Hotstar मिळून झी एंटरटेनमेंट आणि सोनीच्या ज्वॉइट व्हेचर, नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राइम सारख्या स्ट्रीमिंग दिग्गजांचा सामना करतील.