Reliance Communications share: अनिल अंबानींची दिवाळखोर टेलिकॉम सेक्टरची कंपनी- रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) च्या काही रिअल इस्टेट प्रॉपट्री विक्रीस मंजुरी मिळाली आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (NCLT) ने ही मंजुरी दिली आहे. आरकॉम कंपनीकडून शेअर बाजारला याबाबत माहिती देण्यात आली आहे.
रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनीकडून सांगण्यात आलं आहे की, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, मुंबई खंडपीठाचा आदेश, कंपनीच्या रिझोल्यूशन प्रोफेशनलने अर्जासोबत जोडला होता, ज्यामध्ये कंपनीच्या काही मालमत्तेच्या विक्रीसाठी मंजुरी मागितली होती. आता एनसीएलटीने त्याला मान्यता दिली आहे.
कोण-कोणत्या संपत्तीची होणार विक्री ?
विक्रीसाठी निश्चित केलेल्या संपत्तीमध्ये आरकॉमच्या चेन्नईमधील कार्यालयाचा समावेश आहे. त्याचबरोबर चेन्नईमधील अंबत्तूर येथे असणारी ३.४४ एकर जमीन, पुण्यातील ८७१.१ स्क्वेअर फुटाचे ऑफिस तर भुवनेश्वर येथील ऑफिसचीही विक्री होणार आहे. कँपियन प्रॉपर्टीजच्या शेअरमधील गुंतवणूक व रिलायन्स रियॅल्टीच्या शेअरमधील गुंतवणुकीचीही विक्री होणार आहे.
मागील काही काळापासून रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या शेअर्सची ट्रेडिंग २.४९ रुपये दरावर बंद आहे. बीएसई वर Trading Restricted असा मेसेज दाखवत आहे. २००७ मध्ये आरकॉमचे शेअर ७८५ रुपयांवर पोहोचले होते. त्या दराने पाहिले तर आरकॉमचे शेअर ९९ टक्क्यांनी घटले आहेत.
२०१६ मध्ये मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ लाँच केल्यानंतर अनिल अंबानींच्या आरकॉमचा स्थिती खराब होण्यास सुरुवात झाली. प्राइस आणि डेटा वॉरमध्ये ही कंपनी मागे पडत गेली. त्याचबरोबर अनिल अंबानी यांच्या आर्थिक कमजोरीचा फटका कंपनीला बसला. या परिस्थितीत कंपनी बँकांच्या कर्जांना डिफॉल्ट करू लागली व दिवाळखोरीत गेली.