मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Anil Ambani : अनिल अंबांनीच्या कंपनीच्या खरेदीसाठी एकमेव दावेदार, एलआयसी आणि ईपीएफओचे पैसे अडचणीत

Anil Ambani : अनिल अंबांनीच्या कंपनीच्या खरेदीसाठी एकमेव दावेदार, एलआयसी आणि ईपीएफओचे पैसे अडचणीत

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 27, 2023 04:14 PM IST

Anil Ambani : रिलायन्स कॅपिटलच्या लिलावाच्या दुसऱ्या फेरीत फक्त एकाच कंपनीने बोली लावली. या कंपनीवर सुमारे ४० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीचे या कंपनीवर सुमारे ३४०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. ईपीएफओने या कंपनीच्या बाँडमध्ये २५०० कोटी रुपयांची गुंतवणूकही केली आहे.

anil ambani ht
anil ambani ht

Anil Ambani : अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स कॅपिटल या मोठ्या कर्जात बुडालेल्या कंपनीचा बुधवारी दुसऱ्या फेरीसाठी लिलाव झाला. यामध्ये केवळ हिंदुजा कंपनीने बोली लावली. हिंदुजा समूहाने इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्सद्वारे रिलायन्स कॅपिटलसाठी ९,६५० कोटी रुपयांची बोली लावली. यामुळे एलआयसीसह रिलायन्सच्या कर्जदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. याचे कारण कंपनीचे लिक्विडेशन व्हॅल्यू १२,५०० कोटी रुपये आहे. एलआयसीचे रिलायन्स कॅपिटलवर ३,४०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. प्रशासकाने रिलायन्स कॅपिटलच्या आर्थिक कर्जदारांकडून २५,००० कोटी रुपयांचे दावे स्वीकारले आहेत. ईपीएफओने रिलायन्स कॅपिटलच्या बाँडमध्ये २५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

दिवाळखोरी प्रक्रिया

नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी रिलायन्स कॅपिटलमध्ये सुमारे २० वित्तीय सेवा कंपन्या आहेत. यामध्ये सिक्युरिटीज ब्रोकिंग, विमा आणि एआरसी यांचा समावेश आहे. आरबीआयने ३० नोव्हेंबर २०२१ रोजी मोठ्या प्रमाणावर कर्जात बुडलेल्या रिलायन्स कॅपिटलचे बोर्ड बरखास्त केले आणि त्याविरुद्ध दिवाळखोरीची कार्यवाही सुरू केली. नागेश्वर राव यांची सेंट्रल बँकेने कंपनीचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती.

कंपनीवर ४० हजार कोटींपेक्षा अधिक कर्ज

सप्टेंबर २०२१ मध्ये रिलायन्स कॅपिटल कंपनीवर ४० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. एलआयसी या कंपनीवर सर्वाधिक कर्ज आहे. एलआयसीने ३४०० कोटी रुपयांचा दावा केला आहे. जानेवारी २०२२ मध्ये, प्रशासकाने रिलायन्स कॅपिटलच्या आर्थिक कर्जदारांकडून २५ हजार कोटी रुपयांचे दावे स्वीकारले. डिसेंबर २०२१ मध्ये ईपीएफओ​​ने रिलायन्स कॅपिटलमध्ये २५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ऑक्टोबर २०१९ पासून कंपनीने व्याज भरण्यात दिरंगाई केली होती.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग