मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Reliance Capital : रिलायन्स कॅपिटलची विक्री २० मार्चला, ४० हजार कोटी रुपयांचे कर्ज, शेअर्समध्ये तेजी

Reliance Capital : रिलायन्स कॅपिटलची विक्री २० मार्चला, ४० हजार कोटी रुपयांचे कर्ज, शेअर्समध्ये तेजी

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Mar 07, 2023 01:00 PM IST

Reliance Capital : अंदाजे ४० हजार कोटी रुपयांच्या कर्जात अडकलेल्या अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटलच्या दुसऱ्या टप्प्यांचा लिलाव २० मार्चला होणार आहे. टोरेंट ग्रुपने या लिलावाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

anil Ambani HT
anil Ambani HT

Reliance Capital : अंदाजे ४० हजार कोटींच्या कर्जात अडकलेल्या अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटलच्या दुसऱ्या टप्प्याचा लिलाव २० मार्चला होणार आहे. यादरम्यान, टोरेंट समूहाने या लिलावाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. नॅशनल कंपनी लाॅ अपीलेट ट्रिब्यूनल (एनसीएलटी) च्या मंजूरीनंतर दुसऱ्या फेरीच्या लिलावाचे आयोजन केले जात आहे. रिलायन्स कॅपिटलच्या शेअर्समध्ये आज ५ टक्के अप्पर सर्किट आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये सलग चार दिवस अप्पर सर्कीट लागत आहे.

असे आहे प्रकरण

डिसेंबर २०२२ मध्ये रिलायन्स कॅपिटलच्या पहिल्या फेरीचा लिलाव झाला होता. या लिलावात टोरेंटने ८६४० कोटी रुपयांसह सगळ्यात जास्त बोली लावली होती. तर हिंदूजा समूहाने लिलावानंतर ९ हजार कोटी देऊ केले होते. त्यामुळे लेंडर्सनी लिलावाचा दुसरा टप्पा आयोजित केला. टोरेंटने दुसऱ्या टप्प्याला आक्षेप घेत जानेवारीत एनसीएलटीचा दरवाजा ठोठावला. टोरेंटच्या खटाटोपानंतरही दुसऱ्या टप्प्यातील लिलाव सुरु झाला. त्यामुळे आता टोरेंट सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.

रिलायन्स कॅपिटलच्या पहिल्या फेरीच्या लिलावासाठी किमान बोली ९५०० कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. दुसऱ्या फेरीत १० हजार कोटी रुपयांच्या बोलीची गरज असेत. यानंतर अतिरिक्त २५० कोटी रुपये द्यावे लागतील. नव्या नियमांनुसार, प्रत्येक फेरीत बोली लावण्यासाठी ३० मिनिट देण्यात येतील. बोलीदाराला आपले फायनान्शिअल प्रपोजल द्यावे लागेल.

रिलायन्स कॅपिटलचे शेअर्स

सोमवारी रिलायन्स कॅपिटलच्या शेअर्समध्ये तुफान तेजी दिसली. बीएसईवर ५ टक्के वाढून तो १० रुपयावर ट्रेड करत आहे. याचे मार्केट कॅप २५३.२१ कोटी रुपये आहे. या शेअऱ्सचा ५२ आठवड्यातील निचांक ७.८५ रुपये आहे. १ मार्च २०२३ ला ही निचांकी पातळी होती तर ११ एप्रिल २०२२ ला ५२ आठवड्यातील उच्चांकी पातळी २३.३० रुपये गाठली होती.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग