एका दिवसात तब्बल ५० टक्क्यांनी घसरला या मल्टीबॅगर शेअरचा भाव, काय आहे कारण?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  एका दिवसात तब्बल ५० टक्क्यांनी घसरला या मल्टीबॅगर शेअरचा भाव, काय आहे कारण?

एका दिवसात तब्बल ५० टक्क्यांनी घसरला या मल्टीबॅगर शेअरचा भाव, काय आहे कारण?

Nov 29, 2024 04:15 PM IST

raghav productivity enhancers ltd share price : रेखा झुनझुनवाला यांच्याकडं मोठा हिस्सा असलेल्या राघव प्रॉडक्टिव्हिटी एन्हान्सरच्या शेअरमध्ये शुक्रवारी तब्बल ५० टक्क्यांची घसरण दिसून आली.

एका दिवसात तब्बल ५० टक्क्यांनी घसरला शेअरचा भाव, काय आहे कारण?
एका दिवसात तब्बल ५० टक्क्यांनी घसरला शेअरचा भाव, काय आहे कारण?

Rekha Jhunjhunwala portfolio share : अमूक तमूक शेअरनं कमीत कमी दिवसांत दुप्पट, तिप्पट, चौपट परतावा दिल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात. पण एखादा शेअर एकाच दिवसात ५० टक्क्यांवर येण्याची बातमीच क्वचितच येत असते. राघव प्रॉडक्टिव्हिटी एन्हान्सरच्या शेअरच्या बाबतीत हेच झालं आहे. हा शेअर आज निम्म्या किंमतीवर ट्रेड करत आहे.

अर्थात, शेअरमधील ही 'घसरण' प्रत्यक्ष घसरण नसून त्याचं कारण बोनस शेअर्सचं वाटप हे आहे. खरंतर, आज कंपनीनं बोनस शेअरचं १:१ प्रमाणात वाटप केलं. त्याचं प्रतिबिंब शेअरच्या भावावर पडलं. 

राघव प्रॉडक्टिव्हिटी एन्हान्सरचा शेअर गुरुवारी ६ टक्क्यांनी घसरून १,५६२.३५ रुपयांवर बंद झाला. मात्र, शुक्रवारी हा शेअर समायोजित आधारावर सुमारे ५० टक्क्यांनी घसरून ७९३.९५ रुपयांवर व्यवहारासाठी खुला झाला. कंपनीनं शनिवार, ३० नोव्हेंबर ही बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड डेट जाहीर केली होती, परंतु या तारखेच्या आदल्या दिवशी म्हणजे शेअर बाजाराच्या कामकाजाच्या दिवशी वितरणाची कार्यवाही झाली.

तीन वर्षांत साडेतीन हजार टक्के परतावा

हा शेअर राघव प्रॉडक्टिव्हिटी एन्हान्सर लिमिटेडच्या (RPEL) मालकीचा आहे. गेल्या तीन वर्षांत या शेअरमध्ये सुमारे साडेतीन हजार टक्क्यांची वाढ झाली आहे. गुरुवारी, २८ नोव्हेंबर रोजी हा शेअर १६०० रुपयांवर होता. नोव्हेंबर २०२१ मध्ये हा शेअर ४५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत होता. पात्र गुंतवणूकदारांना रेकॉर्ड डेटनुसार कंपनीत असलेल्या प्रत्येक समभागावर एक बोनस शेअर मिळणार आहे.

रेखा झुनझुनवाला यांच्याकडं ११ लाख शेअर

दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांच्याकडं ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत राघव प्रॉडक्टिव्हिटी एन्हान्सरचे ११,०२,८५२ इक्विटी शेअर्स होते. म्हणजेच त्यांचा कंपनीत ४.८० टक्के हिस्सा होता.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner