रेखा झुनझुनवाला यांनी दोन शेअर्समधून अवघ्या १० मिनिटांत कमावले १०५ कोटी, कोणते आहेत हे शेअर?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  रेखा झुनझुनवाला यांनी दोन शेअर्समधून अवघ्या १० मिनिटांत कमावले १०५ कोटी, कोणते आहेत हे शेअर?

रेखा झुनझुनवाला यांनी दोन शेअर्समधून अवघ्या १० मिनिटांत कमावले १०५ कोटी, कोणते आहेत हे शेअर?

HT Marathi Desk HT Marathi
Nov 26, 2024 12:43 PM IST

Share Market Marathi News : देशातील दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी टायटन आणि मेट्रो ब्रँड्सच्या शेअर्समधून १० मिनिटांत १०५.७२ कोटींचा नफा कमावला आहे. कसा ते जाणून घेऊया!

रेखा झुनझुनवाला यांनी दोन शेअर्समधून अवघ्या १० मिनिटांत कमावले १०५ कोटी, कोणते आहेत हे शेअर?
रेखा झुनझुनवाला यांनी दोन शेअर्समधून अवघ्या १० मिनिटांत कमावले १०५ कोटी, कोणते आहेत हे शेअर?

Rekha Jhunjhunwala Portfolio : सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये आज सकाळच्या सत्रात झालेल्या वाढीचा फायदा छोट्या गुंतवणूकदारांबरोबरच दिग्गजांनाही झाला. रेखा झुनझुनवाला यात सर्वात वरच्या क्रमांकावर आहेत. रेखा झुनझुनवाला यांनी आज मोठा नफा कमावला आहे.

शेअर बाजारातील आघाडीची गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी आपल्या पोर्टफोलिओतील टायटन कंपनी आणि मेट्रो ब्रँड्स या दोन शेअर्समधून १० मिनिटांत १०५ कोटींहून अधिक कमाई केली. एनएसईवर आज पहिल्या दहा मिनिटांत टायटनच्या शेअरची किंमत २०.९० रुपयांनी वाढली, तर मेट्रो ब्रँड्सच्या शेअरच्या किमतीत आज भारतीय शेअर बाजाराच्या पहिल्या दहा मिनिटांत ३.९० रुपयांची वाढ झाली.

एनएसईवर आज टायटनच्या शेअरचा भाव ३,३१० रुपये प्रति शेअरवर उघडला आणि ३,३६० रुपये प्रति शेअरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. मात्र, पहिल्या दहा मिनिटांत २०.९० रुपयांची वाढ नोंदवत तो ३,३३० रुपयांवर पोहोचला. त्याचप्रमाणे, एनएसईवर मेट्रो ब्रँड्सचा शेअर १,१७७.१० रुपये प्रति शेअरवर उघडला आणि ओपनिंग बेलच्या पहिल्या दहा मिनिटांतच ३.९० रुपयांची वाढ नोंदवत १,१८०.९५ रुपयांवर पोहोचला. मात्र, प्रॉफिट बुकिंगनंतर हा शेअर उच्चांकी पातळी राखण्यात अपयशी ठरला.

शेअरहोल्डिंग पॅटर्न

जुलै ते सप्टेंबर २०२४ तिमाहीतील टायटन कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडं या कंपनीचे ४,५७,१३,४७० शेअर्स आहेत. टाटा समूहाच्या शेअरमध्ये पहिल्या दहा मिनिटांत २०.९० रुपयांची वाढ झाल्यानं रेखा झुनझुनवाला यांच्या नेटवर्थमध्ये ९५,५४,११,५२३ रुपये म्हणजेच ९५.५४ कोटी रुपयांची वाढ झाली.

त्याचप्रमाणे रेखा झुनझुनवाला यांच्याकडं मेट्रो ब्रँड्सचे २,६१,०२,३९४ शेअर्स आहेत. भारतीय शेअर बाजारात आज पहिल्या १० मिनिटांत मेट्रो ब्रँड्सच्या शेअरची किंमत ३.९० रुपयांनी वाढली, मेट्रो ब्रँड्सच्या शेअर्समध्ये तेजी आल्यानं रेखा झुनझुनवाला यांची नेटवर्थ १०,१७,९९,३३६.६० रुपये म्हणजेच १०.१८ कोटी रुपयांवर पोहोचली. टायटन आणि मेट्रो ब्रँड्सच्या शेअर्सच्या किमतीत वाढ झाल्यानं रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत पहिल्या दहा मिनिटांत १०५.७२ कोटी रुपयांची वाढ झाली.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner